12 December 2024 1:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

TCS Share Price | भरवशाचा TCS शेअर! टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस शेअर्सवर डिव्हीडंड जाहीर, रेकॉर्ड तारीख पाहून फायदा घ्या

TCS Share Price

TCS Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड म्हणजेच TCS कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना दुसरा अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने शेअरधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी रेकॉर्ड डेट म्हणून 20 ऑक्टोबर 2023 हा दिवस निश्चित केला आहे.

मागील आठवड्यात शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.33 टक्के घसरणीसह 3525 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

TCS लाभांश रेकॉर्ड डेट :
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने जुलै 2023 या महिन्यात आपल्या शेअर धारकांना लाभांश वाटप केला होता. या कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 1 रुपयाचा लाभांश दिला होता. जून 2023 तिमाहीत TCS कंपनीची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. म्हणून कंपनी गुंतवणूकदारांना चांगला लाभांश वाटप करु शकते.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी 11 ऑक्टोबर 2023 रोजी लाभांश वाटप करण्यावर अंतिम निर्णय घेणार आहे. या दिवशी TCS कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आणि 20 ऑक्टोबर 2023 हा दिवस लाभांश वाटप करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

गुंतवणुकीवर परतावा :
मागील एका महिन्यात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 5 टक्के परतावा कमावून दिला होता. ज्या गुंतवणूकदारांनी एक वर्षापूर्वी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 17 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 3633.05 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 2950.10 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TCS Share Price today on 02 October 2023.

हॅशटॅग्स

#TCS Share Price(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x