6 May 2025 3:31 PM
अँप डाउनलोड

Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर पुन्हा तेजीने परतावा देणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON

Suzlon Share Price

Suzlon Share Price | मागील १ महिन्यात सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर 13.34% घसरला आहे. १२ सप्टेंबर रोजी सुझलॉन एनर्जी लिमिटेड (NSE: SUZLON) कंपनी शेअर ८६.०४ रुपये या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. मात्र, सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर उच्चांकी पातळीवरून जवळपास १६ टक्क्यांनी घसरले आहेत. सुझलॉन एनर्जी शेअर पुन्हा तेजीत येणार का यावर तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. सोमवार 21 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.58 टक्के घसरून 71.05 रुपयांवर पोहोचला होता. (सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश)

तज्ज्ञांनी काय म्हटले?
स्टॉक मार्केट तज्ज्ञांच्या मते सुझलॉन शेअर पुन्हा तेजीत येऊ शकतो. तर काही तंज्ञाच्या मते सुझलॉन शेअर सध्याच्या प्राईसवरून अजून खाली घसरू शकतो. मागील १ वर्षात सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर्सने 122.52% परतावा दिला आहे.

कंपनी ऑर्डरबुक मजबूत – पण शेअर प्राईस घसरतेय
सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीला या महिन्यात जिंदाल रिन्युएबल्स पॉवर लिमिटेड कंपनीकडून मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. मात्र ऑर्डरबुक मजबूत होऊन देखील सुझलॉन शेअर घसरला आहे. जिंदाल रिन्युएबल्स पॉवर लिमिटेड कंपनीकडून मिळालेल्या कॉन्ट्रॅक्टनुसार सुझलॉन कंपनी १२७ पवन टर्बाइन जनरेटर तसेच हायब्रीड लॅटिस ट्यूबलर टॉवर्स पुरवणार आहे. या उपकरणांची क्षमता ३.१५ मेगावॅट असेल अशी माहिती देण्यात आली आहे. तसेच टाटा पॉवर लिमिटेड कंपनीकडून सुद्धा मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची शक्यता आहे.

सुझलॉन एनर्जीवरील तांत्रिक विश्लेषकांमधील मतभेद
लक्ष्मी-श्री ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी सांगितले की, ‘कमी वॉल्यूम असल्याने शेअरमध्ये घसरण झाली आहे. सुझलॉन शेअरला ६६ रुपयांवर मजबूत सपोर्ट आहे. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर सध्या 72.32 रुपयांवर ट्रेड करतोय.

सुझलॉन शेअर – टार्गेट प्राईस
स्टॉक मार्केट तज्ज्ञ अंशुल जैन यांनी सुझलॉन शेअर सध्याच्या प्राईस लेव्हलवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच यासाठी ६५ रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. अंशुल जैन यांनी सुझलॉन शेअरसाठी ८४ ते ८६ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच 85 रुपयांच्या वर तेजी कायम राहिल्यास हा शेअर 109 रुपये पर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

शेअरने दिलेला परतावा
मागील ६ महिन्यात सुझलॉन शेअरने 77.04% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 122.52% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 2,990% परतावा दिला आहे. YTD आधारावर या शेअरने 87.84% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price 21 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(307)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या