
Tata Technologies Share Price | दिवाळी जवळ आल्याने NSE ने मुहूर्त ट्रेडिंगची वेळ आणि तारीख जाहीर (NSE: TATATECH) केली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजने दिलेल्या माहितीनुसार, दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग सत्र शुक्रवार 1 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडणार आहे. दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगसाठी सायंकाळी 6 ते 7 अशी वेळ निश्चित केली आहे. या वेळेत गुंतवणूकदारांना शेअर्सची खरेदी-विक्री करता येणार आहे. (टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी अंश)
नॅशनल स्टॉक एक्सचेंजने दिलेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबरला नियमित ट्रेडींग होणार नाहीत. मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी शेअर बाजार केवळ १ तास खुला राहणार आहे. NSE ने दिलेल्या माहितीनुसार 1 नोव्हेंबर रोजी प्री-ओपनिंग सेशनची वेळ सायंकाळी 5.45 ते 6.०० अशी असेल. सोमवार 21 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.014 टक्के घसरून 1,059.95 रुपयांवर पोहोचला होता.
मुहूर्त ट्रेडिंग सत्राच्या दिवशी बाजाराची कामगिरी कशी आहे?
ऐतिहासिकदृष्ट्या मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी गुंतवणूकदारांना सकारात्मक परतावा मिळाला आहे. गेल्या १७ पैकी १३ मुहूर्त ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार तेजीसह बंद झाला आहे. 2008 मध्ये जागतिक मंदीच्या काळातही मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी शेअर बाजार 5.86 टक्क्यांनी वधारला होता.
आनंद राठी ब्रोकरेज फर्म – खरेदीचा सल्ला
आनंद राठी ब्रोकरेज फर्मने तांत्रिक निकषांच्या आधारे टाटा ग्रुपच्या शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. टाटा ग्रुपचा हा शेअर पुढील वर्षभरात गुंतवणूकदारांना ५२ टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात. आनंद राठी ब्रोकरेज फर्मने टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअरची खरेदीसाठी निवड केली आहे. आनंद राठी ब्रोकरेज फर्मने टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी टार्गेट प्राईस सुद्धा जाहीर केली आहे.
टाटा टेक्नॉलॉजीज शेअर – BUY रेटिंग
२०२३ मध्ये टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअर स्टॉक मार्केटमध्ये सूचिबद्ध झाला होता. सूचिबद्ध होण्याच्या पहिल्याच दिवशी या शेअरने मोठा परतावा दिला होता. सूचिबद्ध होण्याच्या पहिल्याच दिवशी टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअर १४०० रुपये पर्यंत पोहोचला होता. मात्र, त्यानंतर हा शेअर सातत्याने घसरत आहे. सध्या टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअर 1059 रुपयांवर पोहोचला आहे. मात्र, आता टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअरमध्ये ब्रेकआउटचे संकेत दिसत आहेत. त्यामुळे हा शेअर पुन्हा तेजीने परतावा देऊ शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. आनंद राठी ब्रोकरेज फर्मने येत्या दिवाळीत हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी १३६० ते १४५० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.