
Yes Bank Share Price | शनिवारी येस बँक लिमिटेडचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर होताच शेअर्समध्ये मोठी (NSE: YESBANK) वाढ झाली. बीएसईवर येस बँक शेअरने जवळपास १० टक्क्यांच्या तेजीसह अप्पर सर्किट हिट केला होता. शनिवारी येस बँकेने दुसऱ्या तिमाहीचे सकारात्मक निकाल जाहीर केल्याने सोमवारी शेअर्समध्ये मजबूत तेजी दिसून आली. दुसऱ्या तिमाहीच्या सकारात्मक निकालानंतर येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. (येस बँक लिमिटेड अंश)
येस बँक शेअरची सध्याची स्थिती
सोमवार 28 ऑक्टोबर रोजी येस बँक शेअर 6.60 टक्के वाढून 20.66 रुपयांवर पोहोचला होता. सोमवारी हा शेअर 20.35 रुपयांवर ओपन झाला होता. तसेच सोमवारी 21.29 रुपयांचा उच्चांक गाठला होता. सध्या येस बँक लिमिटेडचे एकूण मार्केट कॅप 64,320 कोटी रुपये आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञांच्या मते, येस बँकेने वार्षिक आधारावर सकारात्मक कामगिरी केली आहे. त्यामुळे पुढे तेजीचे संकेत दिसत आहेत. मंगळवार 29 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.19 टक्के घसरून 20.50 रुपयांवर पोहोचला होता.
येस बँक शेअर टार्गेट प्राइस
चॉइस ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी येस बँक शेअरबाबत सांगितले की, ‘येस बँक शेअरला १८ रुपयांवर मजबूत सपोर्ट आहे. मात्र येस बँक शेअर्स गुंतवणुकदारांनी १६ रुपयांचा स्टॉप लॉस लावावा असा सल्ला दिला आहे. स ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांच्या मते, ‘जर येस बँक शेअर 21 रुपयांच्या पुढे गेला तर तो प्रथम 24 रुपये आणि नंतर 26 रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
येस बँकेला 553 कोटी रुपये नफा झाला
येस बँकेने शनिवारी स्टॉक मार्केटला दुसऱ्या तिमाही निकालाबाबत सांगितले की, वार्षिक आधारावर येस बँकचा निव्वळ नफा १४५ टक्क्यांनी वाढला आहे. येस बँकेला दुसऱ्या तिमाहीत ५५३ कोटी रुपये निव्वळ नफा झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत येस बँक लिमिटेडने २२५.२१ कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता. तिमाही आधारावर येस बँकेच्या निव्वळ नफ्यात १० टक्क्यांची वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय.
दुसऱ्या तिमाहीत येस बँकेला निव्वळ व्याजातून २,२०० कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. जे वार्षिक आधारावर १४.३ टक्क्याने अधिक आहे. येस बँके लिमिटेडच्या NPA मध्येही घट झाली आहे. बँकेने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये NPA १.६% होता.
शेअरने किती परतावा दिला
मागील ६ महिन्यात येस बँक शेअर 23.76% घसरला आहे. मागील १ वर्षात 29.53% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात हा शेअर 68.98% घसरला आहे. तसेच YTD आधारावर हा शेअर 8.79% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.