14 December 2024 2:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

शेतकरी बांधवांनो | रब्बी बियाणे अनुदान योजना ऑनलाईन अर्ज करा, तुमच्या मोबाईलवरून - वाचा प्रक्रिया

Mahadbt Biyane Anudan Yojana 2021

मुंबई, ०५ सप्टेंबर | शेतकरी बंधुंनो रब्बी बियाणे अनुदान योजना संदर्भातील ऑनलाईन अर्ज आता मोबाईलवरून देखील भरता येणार आहे या संदर्भातील माहिती जाणून घेवूयात. शेतकरी बांधव आता रब्बी बियाण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि शासकीय अनुदानाचा लाभ घेऊ शकतात. प्रमाणित बियाणांची वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारित कृषी अवजारे, सिंचन सुविधा यासाठी ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे दिनांक 30 ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२१ पर्यंत महाडीबीटी या पोर्टलवर अर्ज करू शकतात. हा अर्ज मोबाईलवरून देखील केला जाऊ शकतो. मोबाईलचा उपयोग करून हा अर्ज कसा सादर करावा या संदर्भातील माहिती या लेखाच्या खाली दिलेली आहे.

रब्बी बियाणे अनुदान योजना किंवा इतर कोणत्याही योजनेचा अर्ज भरा तुमच्या मोबाईलवरून:
वरील उल्लेख केलेल्या विविध योजनेसाठी किंवा महाडीबीटी वरील कोणत्याही योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी कोणतेही विशेष लायसन्स किंवा आयडी लागत नाही. शेतकरी त्यांच्या मोबाईलवरून हा अर्ज स्वतः सादर करू शकतात. तुमच्या मोबाईलचा उपयोग करून तुम्ही देखील मोबाईलवरच अर्ज सादर करू शकता. शेतकऱ्यांनी या अगोदर जर महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी केली नसेल तर नोंदणी कशी करावी, अर्ज कसा सादर करावा, योजना कशी निवडावी ही आणि इतर माहिती या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

महाडीबीटी पोर्टलवर सर्व योजनांसाठी एकच अर्ज:
शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी कृषी विभागाच्या वतीने महाडीबीटी शेतकरी पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे. या पोर्टलवर शेतकरी अनेक योजनांसाठी एकच अर्ज करू शकतात. महाडीबीटी पोर्टल सुरु झाल्यापासून अनेक शेतकरी त्यांचे अर्ज करतांना दिसत आहेत. एकाच अर्जात अनेक योजनांचा लाभ घेता येत असल्यामुळे हि प्रक्रिया अतिशय सोयीची आणि पारदर्शक झालेली आहे.

ऑनलाईन अर्जामुळे अनेक शेतकरी करताहेत अर्ज:
यापूर्वी शेतकऱ्यांना शेती संबधित योजनांचा लाभ घेण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी कृषी कार्यालयात जावून अर्ज करावा लागत असे. यासाठी शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होत असे, शिवाय अर्ज कोठून घ्यावा, कोठे करावा, कोणत्या अधिकाऱ्याकडे करावा, हि माहिती सर्वसामान्य शेतकऱ्याला नसल्यामुळे ते या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता जास्त निर्माण होत होती परंतु आता महाडीबीटी पोर्टल सुरु झाल्यापासून अनेक शेतकरी विविध विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी एकच अर्ज करत असल्यामुळे अनेक शेतकरी या योजनांचा लाभ घेतांना दिसत आहेत.

रब्बी बियाणे अनुदान योजना संदर्भातील माहिती.
योजनेचे नाव:
महाडीबीटी शेतकरी योजना ( रब्बी बियाणे अनुदान योजना )

योजनेतून मिळणारे फायदे:
रब्बी बियाण्यावर एकूण किमतीच्या 50 टक्के मर्यादेत अनुदान देय राहील.

अर्ज सादर करण्याची पद्धत: ऑनलाईन

वेबसाईट लिंक: https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login

आवश्यक कागदपत्रे: एकूण जमिनीचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक.

मोबाईल फोनवर बियाणे व कृषी अवजरासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत.
* तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोअर उघडा.
* प्ले स्टोअरच्या सर्च बारमध्ये puffin हा कीवर्ड टाका.
* puffin हे ब्राउजर तुमच्या मोबईलमध्ये इंस्टाल करा आणि ओपन करा.
* ब्राउजर ओपन केल्यानंतर त्या ब्राउजरच्या सर्च बार मध्ये टाईप mahadbt कीवर्ड टाका.
* तुमच्या मोबाईलमध्ये mahadbt हे शेतकरी पोर्टल ओपन होईल या ठिकाणी पेजला थोडे झूम करा. पेजला झूम केल्यावर या ठिकाणी लॉगीन करण्याचा पर्याय दिसेल त्यावर टच करा.
* तुमचा युजरआयडी, पासवर्ड आणि कॅपचा कोड दिलेल्या चौकटीमध्ये टाका.
* जसेही तुम्ही आवश्यक असलेली माहिती दिलेल्या चौकटीमध्ये टाईप कराल त्यावेळी तुम्ही लगीन व्हाल.
* डॅशबोर्डची भाषा जर इंग्रजी असेल तर त्याला मराठी सिलेक्ट करा.
* अर्ज करा या बटनावर क्लिक करा.
* दिलेल्या पर्यायांपैकी बियाणे औषधे व खते या पर्यायासामोरील बाबी निवडा या बटनावर टच करा.
* तालुका, गाव, सर्वे नंबर हि माहिती अगोदरच या ठीकानी आलेली असेल ती तपासून घ्या.
* मुख्य घटक या खालील चौकटीमध्ये अनुदानावर बियाणे, औषधे व खते हा पर्याय निवडा.
* बाब निवडा या पर्यायाच्या खाली चौकटीमध्ये बियाणे हा पर्याय निवडा.
* पिक निवडा या पर्यायाच्या खाली दिलेल्या चौकटीवर टच करा. या ठिकाणी तुम्हाला विविध पिकांची यादी दिसेल त्यामधून एक पिक निवडा.
* अनुदान हवी असलेली बाब या पर्यायाच्या खाली दिसत असलेल्या चौकटीवर टच करा. प्रमाणित बियाण्याचे वितरण किंवा पिक प्रात्यक्षिक या पैकी एकज पर्याय निवडा.
* बियाण्यांच्या प्रकारामध्ये उच्च उत्पादनक्षम बियाणे हा पर्याय निवडा.
* खत निवडा हा पर्याय या ठिकाणी लागू होत नाही त्यामुळे या ठिकाणी कोणतीच माहिती तुम्हाला भरायची नाही.
* वाण निवडा या पर्यायावर टच करतात या ठिकाण जुने किंवा नवे वाण शेतकऱ्याने निवडणे आवशयक आहे.
* वाण या पर्यायावर टच करताच विविध वाण शेतकऱ्यांना दिसतील,हवे असलेले वाण या ठिकाणी शेतकरी निवडू शकतील.
* एकूण क्षेत्र हि माहिती या ठिकाणी अगोदरच आलेली असेल
* क्षेत्र ( हेक्टर ) या पर्यायाला टच करून जेवढ्या क्षेत्रासाठी तुम्हाला बियाणे हवे आहे तितके क्षेत्र निवडा.
* अंदाजित आवश्यक बियाणे या पर्यायामध्ये तुम्ही निवडलेल्या क्षेत्रानुसार बियाणे किलोग्रॅममध्ये या ठिकाणी दिसेल.
* शेतकरी बंधुनो तुम्ही ज्या वाणासाठी अर्ज करत आहात ते वाण न मिळाल्यास जे वाण कृषी विभागाकडे उपलब्ध होईल ते वाण शेतकऱ्यांना देण्यात येईल हि अट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ती अट मान्य करण्यासाठी दिलेल्या चौकटीमध्ये टिक करा.
* सर्वात शेवटी जतन करा या हिरव्या रंगाच्या बटनावर टच करा.

अर्ज सादर करण्याची पद्धत:
शेतकरी बंधुंनो अशा पद्धतीने या ठिकाणी बियाण्यासाठी अर्ज जतन करण्यात आलेला आहे परंतु हा अर्ज अजून सादर झालेला नाही. अर्ज सादर करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.

* वेबसाईटच्या मुख्यमेनूवर जा.
* अर्ज करा या बटनाला टच करा.
* पहा या बटनाला टच करा.
* जितक्या योजनांसाठी शेतकऱ्याने ऑनलाईन अर्ज केलेला आहे त्या प्राधान्यक्रमांक द्या.
* अर्ज सादर करा या बटनाला टच करा.
* आपण घटकासाठी अर्ज सादर केलेला आहे असा संदेश तुम्हाला येईल म्हणजेच तुमचा अर्ज सादर झालेला आहे.

रब्बी बियाणे अनुदान योजना अर्ज शुल्क भरण्याची पद्धत.
तुम्ही जर नवीन शेतकरी असाल तर सर्व कर लावून २९ रुपयाच्या आसपास रक्कम तुम्हाला या अर्जासाठी भरावी लागणार आहे. परंतु तुम्ही नुकताच अर्ज केला असेल आणि परत काही दिवसांनी अर्ज करत असाल तर अशावेळी तुम्हाल शुल्क आकारले जात नाही. परंतु तुम्ही नवीन नोंदणी करून हा अर्ज सादर करत असाल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी २९ रुपयाच्या आसपास शुल्क आकारले जाईल.

* Make payment या बटनाला टच करा.
* मध्यम निवडा.
* दिलेले पर्याय वापरून पेमेंट करा.
* पेमेंट केल्यानंतर पेमेंटची पावती तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा.

अर्जाची पावती डाउनलोड करा.
पेमेंट केल्यावर किंवा घटक यशस्वीपणे add केल्यावर परत एकदा वेबसाईटच्या मुख्य मेनूवर जा.

* मी अर्ज केलेल्या बाबी हा पर्याय दिसेल त्यावर टच करा.
* छाननी अंतर्गत अर्ज या पर्यायावर टच करा.
* ज्या अर्जाची पोच पावती तुम्हाला हवी असेल त्या पर्यायासमोरील डाउनलोड बाण शोध आणि त्यावर टच करा.
* तुम्ही केलेल्या अर्जाची पावती तुमच्या मोबईलमध्ये दिसेल ती जतन करा.

अशा पद्धतीने तुम्ही बियाणे योजना अनुदानासाठी अर्ज करू शकता.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How to apply for Mahadbt Biyane Anudan Yojana 2021.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x