
Smart Investment | LIC ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एलआयसी ग्राहक आता केवळ 45 रुपयांची बचत करून काही वर्षांतच 25 लाख रुपयांचा मोठा फंड तयार करू शकतात.
जीवन आनंद पॉलिसी :
अशातच एलआयसीची एक जबरदस्त पॉलिसी फार कमी लोकांना माहित आहे. जिचं नाव ‘जीवन आनंद पॉलिसी’ असं आहे. जीवन आनंद पॉलिसीमध्ये तुम्हाला एक चांगलं कव्हर प्रधान होते. गुंतवणुकीवर चांगल्या कव्हर सह तुम्हाला चांगला परतावा देखील देण्यात येतो. जीवदानंद पॉलिसीमध्ये पैसे गुंतवणार या ग्राहकांना प्रीमियम पेमेंटचा काळ पूर्ण झाल्यानंतर पॉलिसी कव्हर मिळते.
असा तयार होईल 25 लाखांचा फंड :
एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसीमध्ये तुम्हाला प्रत्येक दिवसाला केवळ 45 रुपयांची बचत करायची आहे. ही बचत एका महिन्यातच 1,358 रुपये साठवते. म्हणजेच प्रतिमहा 1,358 रुपये साठवून तुम्ही 35 वर्षांमध्ये 25 लाखांचा फंड अगदी सहजरित्या तयार करू शकता.
पॉलिसीमध्ये मिळणारे लाभ :
या टर्म पॉलिसीमध्ये तुम्हाला केवळ मृत्यू आणि बोनस लाभ नाही तर, सुरक्षिततेसाठी एक्सीडेंटल डेथ आणि विकलांगता रायडर यांसारख्या सुविधा प्रदान केल्या जातात. त्याचबरोबर या पॉलिसीमध्ये तुम्हाला अगदी साधा सोपा पेमेंट प्रीमियर मिळतो. तुम्ही तुम्हाला हवी तेव्हाच पॉलिसी सरेंडर देखील करू शकता. एखाद्या व्यक्तीचा जागी मृत्यू झाला तर, जीवन आनंद पॉलिसी पॉलिसीधारकाला 5 लाख रुपयांची रक्कम देते.
एलआयसी जीवन आनंद पॉलिसीची मुख्य वैशिष्ट्ये :
1. जीवन आनंद पॉलिसी ही एलआयसीची एक पारंपारिक एंडोमेंट पॉलिसींपैकी एक आहे. जी अतिरिक्त बोनस आणि सुरक्षा प्रदान करते.
2. पॉलिसीधारकाचा अचानक मृत्यू झाल्यानंतर जी काही देय रक्कम असेल ती पॉलिसीधारकाच्या नॉमिनीला प्राप्त होते.
3. पॉलिसी धारकाला जिवंतपणे चांगले कव्हर देण्यात येते आणि पॉलिसी सक्रिय राहते.
4. या पॉलिसी तर तुम्हाला अतिरिक्त टॉप-अप कवर देखील देण्यात येते.
5. निवडलेल्या कालावधीनुसार तुम्हाला काळ संपल्यानंतर एक रक्कम पैसे देण्यात येतात.
6. तुम्हाला देखील या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर कमीत कमी तुमचे वय 18 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. तर, जास्तीत जास्त वयाची मर्यादा 50 वर्ष दिली गेली आहे. त्याचबरोबर पॉलिसीचा काळ 15 ते 35 वर्षांपर्यंत आहे.
7. मूळ विम्याची रक्कम 1,00,000 रुपये एवढी आहे.
8. यामध्ये तुम्हाला प्रीमियम सूट देखील मिळते. जी वार्षिक पेमेंटसाठी 2% तर, अर्धवार्षिक पेमेंटसाठी 1% आहे.
9. पॉलिसी सुरू करून एकूण 3 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला लोनची सुविधा देखील देण्यात येते.
असे जमा होतील 25 लाख रुपये :
वरील सांगितलेल्या कॅल्क्युलेशनप्रमाणे ही योजना 15 ते 35 वर्षांसाठी चालत राहते. या योजनेमध्ये तुम्हाला दोन प्रकारचे बोनस मिळतात. यामधील 35 वर्षांमध्ये जमा असलेल्या रकमेवर 5 लाख 70 हजार 500 आणि 5,00,000 लाखांच्या विमारक्कमेचा समावेश आहे. त्याचबरोबर पॉलिसीधारकाला जमा रक्कमेव्यतिरिक्त 8.60 लाख रुपयांचा बोनस आणि 11.50 लाख रुपयांचा अंतिम बोनस प्राप्त होतो. दरम्यान या पॉलिसीवर तुम्हाला टॅक्स सूटचा लाभ अनुभवता येत नाही.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.