15 December 2024 4:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
x

रिलायन्स इंडस्ट्रीज या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करणार

Reliance Industries, Salary, Lockdown, Corona crisis

मुंबई, ३० एप्रिल: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या व्यवसायावर कोरोना साथीचा परिणाम झाला आहे. विशेषत: हायड्रोकार्बनच्या व्यवसायात तोटा सुरु झाला आहे. कारण रिलायन्सच्या रिफाईंड प्रोडक्ट आणि पेट्रोकेमिकल्सची मागणी कमी झाली आहे.

आता, रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात कंपनीने हायड्रोकार्बन व्यवसायाशी संबंधित कर्मचार्‍यांचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्सच्या हायड्रोकार्बन व्यवसायात काम करणाऱ्या ज्या कर्मचार्‍यांचे वार्षिक वेतन १५ लाखाहून अधिक आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या वेतनात १० टक्क्यांनी कपात केली जाईल.

याशिवाय रिलायन्सचे बडे अधिकारी, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक यांच्या पगारावरही कात्री लावण्यात आली आहे. या साऱ्या वरिष्ठांना ३० ते ५० टक्के कपात सहन करावी लागणार आहे. तसेच खुद्द रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानींनी एकही रुपया न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये सांगण्यात आले आहे की, कोरोना महामारीमुळे कंपनीला व्यवसायाची पूणर्बांधणी करण्याची संधी मिळाली आहे. २०१९-२० मध्ये कंपनीच्या संचालकांची एक बैठक झाली होती. यामध्ये ऑडिट अहवालावर चर्चा करण्यात आली होती. आज चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर होणार आहेत. याआधीच कंपनीने पगार कपातीची घोषणा केली आहे.

 

News English Summary: Led by Reliance Industries chairman Mukesh Ambani, the company has decided to cut the salaries of its employees in the hydrocarbon business. Employees working in Reliance’s hydrocarbon business with an annual salary of more than Rs 15 lakh will have their pay cut by 10 per cent.

News English Title: Story Reliance industries decided to reduce the salaries of employees lockdown News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x