14 December 2024 11:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

जिओ फायबर लाँच; आता घर बसल्या पाहा फर्स्ट डे फर्स्ट शो: रिलायन्सची घोषणा

JIO Net, Jio Internet, Jio Fiber, JIO GiagFiber, Mukesh Ambani

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) कंपनीची मुंबईत सोमवारी ४२वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यात बहुप्रतिक्षित जिओ फायबर, जिओ फोन ३, जिओ सेटऑफ बॉक्स आणि जिओ गिगा टीव्ही या सेवांबाबत इतर सेवांची घोषणा केली. पाच सप्टेंबर जिओच्या तिसऱ्या वाढदिवशी जिओ फायबर कमर्शिअल लाँच करण्यात येणार आहे. याचे ७०० रुपयांपासून प्लॅन सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

जिओ गिगाफायाबरच्या प्लॅनची सुरुवात ७०० रुपयांपासून सुरु होणार आहे. हे प्लॅन १०,००० रुपयांपर्यंत आहेत. तसेच फायबर वार्षिक वेलकम ऑफरअंतर्गत 4D/4K टीव्ही आणि त्याचसोबत ४-के ची मजा लुटण्यासाठी सेट अप बॉक्स मोफत मिळणार आहे. गिगाफायबरची सेवा येत्या 5 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

जुन २०२०पर्यंत ही सुविधा जिओ फायबरवर उपलब्ध होणार असल्याचं मुकेश अंबानी यांनी सांगितलं. या सुविधेमुळं ग्राहकांना सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच जिओ फायबरवर पाहता येणार आहे. मात्र ही सुविधा फक्त प्रिमियम मेंबरसाठी उपलब्ध असणार आहे. जिओनं एमआर हेडसेटचीही आज घोषणा केली आहे. या हेडसेटमुळं चित्रपट थ्रीडी स्वरुपात दिसणार आहे.

हॅशटॅग्स

#Technology(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x