6 December 2024 5:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bajaj Bikes | बजाज कंपनीच्या बाईक खरेदीसाठी शोरूमबाहेर मोठी गर्दी; 30 दिवसांत तब्बल 4 लाखांहून अधिक गाड्यांची विक्री Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला गर्दी, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, अशी संधी सोडू नका - Penny Stocks 2024 IRFC Share Price | IRFC सहित 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड Vedanta Share Price | वेदांता शेअर फोकसमध्ये आला, रॉकेट तेजीचे संकेत, सकारात्मक बातमी आली - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीचा मोठा निर्णय, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER EDLI Scheme | पगारदारांना सुखद धक्का; EDLI योजना 3 वर्षांनी वाढली, लाभ घेणे आणखीन झाले सोपे, वाचा सविस्तर - Marathi News
x

EPF Withdrawal | ऐका हो ऐका, नवीन नियमानुसार नोकरदारांना EPF खात्यातून 1 लाख रुपये सहज काढता येणार - Marathi News

Highlights:

  • EPF Withdrawal
  • असा आहे ईपीएफओचा नवा नियम :
  • ही सुविधा सुद्धा मिळणार :
  • अशावेळी काढू शकता फंड :
  • पीएफ अकाउंटमधून अशा पद्धतीने काढा फंड :
EPF Withdrawal

EPF Withdrawal | ईपीएफओ म्हणजेचं ‘कर्मचारी भविष्य निधी संघटन’ त्यांच्या कर्मचाऱ्यांना अनेकानेक सुविधांचा लाभ प्रदान करत आहेत. ज्यामध्ये एकीकडे इन्वेस्टमेंट करून मोठा फंड जमा करण्यासोबतच पेन्शन देखील घेऊ शकतात. त्याचबरोबर ईपीएफओ त्यांच्या कर्मचाऱ्यांना अंशिक स्वरूपात पैसे काढण्याची सुविधा देखील प्रदान करते. परंतु आता ईपीएफओने अंशिक स्वरूपात पैसे काढतीचे नियम पूर्णपणे बदलले आहेत. आता ईपीएफओ धारकांना जास्त सुविधा देण्यात आली असून धारक सुविधेचा जास्त लाभ घेऊ शकतात.

असा आहे ईपीएफओचा नवा नियम :
ईपीएफओने अंशिक पैसे काढतीच्या नियमांमध्ये थोडेसे बदल केले आहे. नवीन नियमांबाबतची सर्व माहिती केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मंडाविया यांनी दिली असून, त्यांच्या माहितीनुसार आता ईपीएफ अकाउंटमधून 50000 नाही तर 1 लाख रुपयांपर्यंत रक्कम काढता येणार आहे.

ही सुविधा सुद्धा मिळणार :
आधी पैसे काढण्यासाठी दीर्घकाळ थांबावं लागायचं. परंतु आता तसं नाही. कर्मचाऱ्यांना 6 महिन्यांच्या आतच पूर्णपणे पैसे काढता येणार आहेत. एवढेच नाही तर एखाद्या कर्मचाऱ्याला 6 महिन्यानंतर काम सोडायचे असेल तर, तो पीएफ खात्यातून पूर्णपणे अमाऊंट काढून घेऊ शकतो.

अशावेळी काढू शकता फंड :
पीएफ अकाउंटमधून पैसे काढण्यासाठी लग्नसमारंभ, उच्च शिक्षणासाठी लागणारे भरघोस पैसे, कुटुंबावर ओढावलेली भयावय परिस्थिती. यांसारख्या मोठमोठ्या आपत्कालीन कारणांसाठी तुम्ही फंड काढू शकता.

पीएफ अकाउंटमधून अशा पद्धतीने काढा फंड :
सर्वप्रथम ईपीएफओच्या ई-सेवा पोर्टलवर जा. तिथे गेल्यानंतर मेंबर ऑप्शनवर क्लिक करा. पुढे UAN नंबर आणि पासवर्ड कॅपचाच्या मदतीने लॉगिन करून घ्या. लोगिन केल्यानंतर ‘ऑनलाइन सर्विस’ या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर फॉर्म फॉर्म 13, 19, 10C आणि 10D यामधून एकाला निवडा. त्यानंतर पर्सनल डिटेल्स व्हेरिफाय करून 13 नंबरचा फॉर्म सिलेक्ट करून पैसे काढण्यासाठीचे कारण सांगावे. त्यानंतर तुमच्या रजिस्टर नंबरवर ओटीपी पाठवण्यात येईल. हा ओटीपी भरून फॉर्म सबमिट करा. फॉर्म पूर्णपणे सबमिट झाल्यानंतर ऑनलाइन सर्विसेजमध्ये जाऊन क्लेम प्रोसेस ट्रॅक करा. तुमची क्लेम अमाउंट फक्त 7 ते 10 दिवसांमध्ये तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर केली जाईल.

Latest Marathi News | EPF Withdrawal Limit Rules 25 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#EPF Withdrawal(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x