5 November 2024 3:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO
x

Laapataa Ladies | 'लापता लेडीज' ने घेतली ऑस्करमध्ये एन्ट्री, किरण आणि अमीरचं स्वप्न झालं पुर्ण - Marathi News

Highlights:

  • Laapataa Ladies
  • जाणून घ्या अमीर खान यांची प्रतिक्रिया :
  • लापता लेडीजची चांगलीच हवा :
Laapataa Ladies

Laapataa Ladies | 2024 सालचा सर्वात सुपर डुपर हिट करणारा चित्रपट म्हणजे ‘लापता लेडीज’. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नसेल तरीसुद्धा अनेक प्रेक्षकांच्या मनावर या चित्रपटाने आणि या चित्रपटातील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर गाजवलं आहे. या चित्रपटाने ओटीटी प्लॅटफॉर्मवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. प्रत्येकाच्या तोंडात फक्त लापता लेडीजच नाव ऐकायला मिळत होतं.

‘लापता लेडीज’ या चित्रपटाची स्टोरी प्रेक्षकांना चांगलीच भावली. फक्त प्रेक्षकच नाही तर या चित्रपटाचे डायरेक्टर मिस्टर परफेक्शनीस्ट अभिनेता ‘आमिर खान’ आणि त्यांची एक्स पत्नी ‘किरण राव’ या दोघांचं देखील या चित्रपटाबाबतच स्वप्न पूर्ण झालं आहे. चित्रपटाला ऑस्करमध्ये एन्ट्री मिळाली असून, भारत रिप्रेझेंट करण्यासाठी किरण आणि अमीरच्या चित्रपटाला निवडलं गेलं. याच कारणामुळे किरण राव अतिशय आनंदात पाहायला मिळतीये.

जाणून घ्या अमीर खान यांची प्रतिक्रिया :
अभिनेता आमिर खान यांनी लापता लेडीजला मिळालेल्या ऑस्कर एन्ट्रीबाबत आपली प्रतिक्रिया कळवली आहे. आमिर खान म्हणाले की,’आम्ही सर्वचजण या माहितीमुळे प्रचंड खुश आहोत. मला किरण आणि तिच्या टीमवर भरपूर गर्व आहे. मी फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या सिलेक्शन कमिटीला धन्यवाद बोलू इच्छितो. ज्यांनी ऑस्करमध्ये भारताला रिप्रेझेंट करण्यासाठी आमच्या चित्रपटाची निवड केली’.

त्याचबरोबर पुढे अमीर असं देखील म्हणाले की,’ समस्त मीडिया आणि फिल्म इंडस्ट्रीत असणाऱ्या सर्वांना हार्दिक आभार प्रदर्शन’. त्यानंतर आमिरच्या बोलण्यावरून असं देखील वाटत होतं की, ते या चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकित केल्याबद्दल ते प्रचंड खुश आहेत. शेवटी अमीर असं म्हणाले की,’ मला अपेक्षा आहे की, लापता लेडीज अकॅडमी मेंबर्सला प्रचंड आवडेल’.

लापता लेडीजची चांगलीच हवा :
लापता लेडीज बद्दल किरण राव यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या प्रतिक्रियेतून त्यांनी अमीरचं प्रचंड कौतुक केल्याचं पाहायला मिळतंय. लापता लेडीज हा चित्रपट 1 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस आला. यामधील सर्वच कलाकारांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या. या भूमिका आणि चित्रपटाची स्टोरी कधीच कोणी विसरणार नाही. एवढेच नाही तर चित्रपटामधील ‘ओ सजनी रे’ या गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर एक कोमल चादर पसरवली आहे. दरम्यान चित्रपटांमध्ये निशांती गोयल, स्पर्श श्रीवास्तव, प्रतिभा रांट आणि रवी किशन हे चार कलाकार मुख्य भूमिकेत झळकतांना दिसले.

Latest Marathi News | Laapataa Ladies Oscar Entry 25 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Laapataa Ladies(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x