28 April 2024 12:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

अभिनंदनाची एकही संधी न सोडणारा मोदी भक्त अक्षय कुमार कलम ३७० वरून शांत?

Akshay Kumar, Modi Bhakt, Bollywood, PM Narendra Modi

नवी दिल्ली : काल जम्मू काश्मीरचं विभाजन आणि कलम ३७० हटवल्याचा प्रस्ताव राज्यसभेत पारित झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे खासदार गुमान सिंह यांनी सोमवारी नरेंद्र मोदींचा युगपुरुष असा उल्लेख करत ही मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टीचे खासदार यांनी सोमवारी नरेंद्र मोदींचा युगपुरुष असा उल्लेख करत ही मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, काश्मीरबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयामुळे कोट्यावधी भारतीयांना आनंद झाला आहे. त्यामुळे त्यांना भारतरत्न दिला पाहिजे अशी मागणी सभागृहाच्या शुन्य प्रहारात करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे आणखी एक शिवाजी महाराज आहेत अशा शब्दात मोदींवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. कलम ३७० हटवणं हा एक धाडसी निर्णय आहे. या निर्णयामुळे भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिली आहे असं त्यांनी सांगितले. यावेळी भाजप खासदार विजय गोयल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे आणखी एक शिवाजी महाराज आहेत. ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी वाईट शक्तींविरोधात लढाई केली होती. तसेच दहशतवाद आणि भ्रष्टाचाराविरुद्ध नरेंद्र मोदींची लढाई निरंतर आहे असं त्यांनी सांगितले.

दरम्यान, मोदींचा सर्वात मोठा चाहता असणारा अभिनेता अक्षय कुमार समाज माध्यमांवर नेहमीच सक्रिय असतो आणि त्यात विषय जर मोदींशी संबंधित असेल तर अभिनंदन करणारा पहिला कलाकार देखील तोच असतो. मात्र जम्मू काश्मीर संबंधित बातमीनंतर अक्षय कुमार समाज माध्यमांवर आलाच नसल्याचं दिसत आहे. वास्तविक बॉलिवूड’च्या कलाकारांचा भारतानंतर सर्वाधिक चाहता वर्ग हा पाकिस्तानमध्ये आहे. अधिकृतरीत्या आणि अनधिकृतरित्या भारताची बॉलिवूडची मोठी बाजारपेठ पाकिस्तानशी जोडलेली आहे. विषय एवढ्यावरच नसून, २०१४ मध्ये मोदी सत्तेत येण्यापूर्वी पेट्रोलचे भाव वाढल्यावर ट्विट करणारा अक्षय कुमारला सध्या देशाची अर्थव्यवस्था सातव्या क्रमांकावर कोसळली तरी काहीच कल्पना नसते हे विशेष म्हणावे लागेल. अजून पर्यंत तरी त्याची शेवटची पोस्ट ही इतर विषयांवर असल्याची दिसते.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x