
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर सध्या ६० रुपयांच्या खाली ट्रेड (NSE: SUZLON) करत आहे. मागील काही दिवसात सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली आहे. मागील 3 महिन्यांत सुझलॉन शेअर 29 टक्क्यांनी घसरला आहे. १२ नोव्हेंबरपासून सुझलॉन एनर्जी शेअर ६० रुपयांच्या खाली ट्रेड करत आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
सोमवारी सुझलॉन एनर्जी शेअर 4.18 टक्के वाढून 59.10 रुपयांवर पोहोचला होता. 12 सप्टेंबर रोजी सुझलॉन एनर्जी शेअर 86.05 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. त्या उच्चांकापासून सुझलॉन शेअर ३३.११ टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळे गुंतवनिकदारांची चिंता वाढली होती.
सुझलॉन स्टॉक चार्टवर संकेत
सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप ७८,३१५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागील १ वर्षात सुझलॉन एनर्जी शेअरने 42.93 टक्के आणि दोन वर्षांत ६०४ टक्के परतावा दिला आहे. 12 डिसेंबर 2023 रोजी सुझलॉन शेअरची 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळी 33.83 रुपये होती.
सुझलॉन शेअरचा मूव्हिंग एव्हरेज
सुझलॉन शेअरचा बीटा १.१ आहे, जो वर्षभरात उच्च अस्थिरता दर्शवितो. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर त्याच्या 10-दिवस, 20-दिवस, 30-दिवस, 50-दिवस, 100-दिवस, 150-दिवसांपेक्षा कमी परंतु 200-दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेज पेक्षा कमी दराने ट्रेड करत आहे.
स्टॉकबाबत तज्ञांचे मत
स्टॉक मार्केट तज्ज्ञ ए. आर. रामचंद्रन सुझलॉन शेअरबाबत म्हणाले की, ‘सुझलॉन एनर्जी शेअर चार्टनुसार हा शेअर अजून घसरू शकतो. नजीकच्या भविष्यात ६९ रुपयांच्या टार्गेट’साठी डेली क्लोजिंग ५९.३ रुपयांच्या तुलनेत जास्त असेल तरच गुंतवणूकदारांनी खरेदी करावी असा सल्ला त्यांनी दिला आहे.
स्टॉकबॉक्स ब्रोकरेज फर्म
स्टॉकबॉक्स ब्रोकरेज फर्मचे तज्ज्ञ म्हणाले, “सुझलॉन एनर्जी शेअर सध्या 58 रुपयांवर ट्रेड करतोय. मागील ३ महिन्यात शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीपेक्षा 37 टक्क्यांनी घसरला आहे. स्टॉकबॉक्स ब्रोकरेज फर्मने सुझलॉन शेअरसाठी ७२ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच ५१.५ रुपये स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे.
आनंद राठी ब्रोकरेज फर्म
आनंद राठी ब्रोकरेज फर्मचे तज्ज्ञ म्हणाले की, ‘सुझलॉन शेअरला 53 रुपयांवर सपोर्ट आहे आणि रेझिस्टन्स 66 रुपयांवर आहे. सुझलॉन शेअरने ६६ रुपयांची पातळी ओलांडल्यास पुढे ७० रुपयांपर्यंत वाढू शकतो. शॉर्ट टर्ममध्ये सुझलॉन शेअर ५३ ते ७० रुपयाच्या रेंजमध्ये ट्रेड करेल असं आनंद राठी ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.