
FD Calculator | सध्याच्या घडीला स्टॉक मार्केट त्याचबरोबर म्युच्युअल फंड आणि एसआयपीमध्ये अनेक व्यक्ती आपले पैसे गुंतवून करोडपती बनत आहेत. त्याचबरोबर बँक FD मध्ये देखील सुरक्षित गुंतवणुकीसाठी लोक धावा करताना दिसत आहे. बँकेची एफडी योजना तुम्हाला सुरक्षित आणि चांगला परतावा देण्यासोबतच चांगले व्याजदर देखील देते. परंतु तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावे FD उघडली तर, तुम्हाला आणखीन जास्त व्याजदर आणि इतरही सुविधांचा लाभ घेता येतो. चला पाहूया सविस्तर माहिती.
40,000 पेक्षा अधिक व्याजावर कापले जाते टीडीएस :
समजा तुम्ही एका वर्षामध्ये फिक्स डिपॉझिटवर 40 हजारापेक्षा अधिक व्याज प्राप्त करत असाल तर, तुम्हाला त्यामधील 10% रक्कम टीडीएस म्हणुन भरावा लागेल. परंतु हीच FD जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावे केली तर, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा TDS भरावा लागत नाही. कारण की बऱ्याच सर्व सामान्य कुटुंबातील महिला कोणताही प्रकारची नोकरी करत नाहीत. शक्यतो त्या गृहिणीच असतात. त्यामुळे पत्नीच्या नावे एफडी करून जास्तीत जास्त लाभ मिळवा.
2.5 लाखांपेक्षा कमी टॅक्सेबल इन्कमवर मिळते टीडीएस सूट :
समजा एखाद्या व्यक्तीचे टॅक्सेबल इन्कम 2.5 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना टीडीएसवर सूट देखील मिळते. त्याचबरोबर एफडीवर मिळणाऱ्या व्याजावरच तुमची इन्कम गणना होते. समजा एखाद्या व्यक्तीला वार्षिक इन्कम 9 लाख रुपये आहे आणि FD व्याज स्वरूपात त्याला 1.20 लाख रुपये मिळतात. तर, एकूण वार्षिक वेतन 10.20 लाख रुपये असेल. म्हणजेच त्या व्यक्तीला 10.20 लाखांच्या हिशोबानेच टॅक्स पेमेंट करावे लागेल.
जॉईंट एफडीवर देखील मिळणार जबरदस्त फायदा :
समजा तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावाने FD सुरू केली तर, तुम्हाला केवळ टीडीएस नाही तर एडिशनल टॅक्सपासून देखील सुटकारा मिळेल. यासाठी तुम्हाला जॉईंट खातं उघडून तुमच्या पत्नीला 1st अकाउंट होल्डर बनवावं लागेल. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पैशांची चांगलीच बचत करू शकता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.