
Credit Card Instruction | काही व्यक्ती मोठ्या हौसेने क्रेडिट कार्ड विकत घेतात. क्रेडिट कार्डचा वापर देखील करतात परंतु काही चुकीच्या कारणांमुळे त्यांच्यावर क्रेडिट कार्ड बंद करण्याची वेळ येते. त्याचबरोबर काही क्रेडिट कार्डवर वारंवार वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क देखील आकारले जातात. या स्वतःच्या त्रासामुळे लोक क्रेडिट कार्ड वापरण्यास बंद करून टाकतात. क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची खास काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्ही अगदी सहजपणे तुमचं क्रेडिट कार्ड बंद करू शकता.
बाकी असलेले पेमेंट पूर्ण करा :
क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या ॲपवरून शॉपिंग करतो. त्याचबरोबर इतरही काही ट्रांजेक्शन करतो. समजा एखाद्या व्यक्तीने क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कोणती वस्तू खरेदी केली असेल आणि तिचं पेमेंट पूर्ण केलं नसेल तर, तुम्ही सहजासहजी क्रेडिट कार्ड बंद करू शकत नाही. यासाठी तुम्हाला तुमची सर्व बिले आणि बाकी पेमेंट पूर्ण करावे लागेल.
रीवॉर्ड पॉईंट रेडीम करायला विसरू नका :
बहुतांश व्यक्ती क्रेडिट कार्डच्या त्रासापासून सुटकारा मिळवण्यासाठी लवकरात लवकर क्रेडिट कार्ड कसं बंद करता येईल याकडे लक्ष देतात. परंतु त्यांना त्यांचे रिवॉर्ड पॉइंट आठवणीत राहत नाहीत. तुम्ही खर्च केलेल्या पैशांतून तुम्हाला रिवॉर्ड पॉईंट्स मिळालेले असतात. त्यामुळे आपले हक्काचे पॉईंट्स घेण्यास मागेपुढे पाहू नका.
बँकेला कॉल करून कळवा :
क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी तुम्हाला तुम्ही ज्या बँकेतून क्रेडिट कार्ड घेतलं आहे त्या बँकेत फोन करून क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी सांगावं लागेल. त्यानंतर बँक तुमच्याकडून काही महत्त्वाचे डिटेल्स घेईल आणि तुम्हाला क्रेडिट कार्ड बंद करण्यामागचं कारण देखील विचारण्यात येईल. सर्व कागदपत्रे त्याचबरोबर योग्य उत्तरांसह क्रेडिट कार्ड बंद करून द्यायचं आहे.
त्याआधी स्टँडिंग इन्स्ट्रक्शन चेक करा :
क्रेडिट कार्ड बंद करण्याकरिता बँकेमध्ये फोन करण्याआधी तुम्हाला स्टॅंडिंग इन्स्ट्रक्शन तपासून पहायच्या आहेत. यामध्ये मासिक ओटीटी चार्ज, इन्शुरन्स प्रीमियम यांसारख्या विविध स्टँडिंग इन्स्ट्रक्शन तपासून घ्या. नाहीतर तुम्हाला कार्ड बंद करण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो.
क्रेडिट कार्ड कापायला विसरू नका :
क्रेडिट कार्ड पूर्णपणे बंद झाल्यानंतर अनेक व्यक्ती ते कचराच्या डब्यामध्ये फेकून देतात. परंतु असं केल्याने तुमचं क्रेडिट कार्ड चुकीच्या हाती लागून तुमच्याविषयी फ्रॉड केस देखील होऊ शकते. अशावेळी तुम्ही क्रेडिट कार्ड फेकण्याआधी तिरकस कापा. म्हणजेच क्रेडिट कार्डचे दोन भाग करा आणि मगच कचऱ्याच्या डब्यात फेकून द्या.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.