16 June 2024 11:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 17 जून 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 17 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Renault Duster 2024 | लाँच होतेय 7 सीटर Renault Duster SUV, सर्व फीचर्ससह खासियत जाणून घ्या Shukra Rashi Parivartan | शुक्र राशी परिवर्तनात 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे? चांदीच-चांदी होणार या काळात Railway Confirm Ticket | रेल्वे प्रवाशांनो! वेटिंग तिकिटची झंझट संपणार, सर्वांना मिळणार कन्फर्म तिकीट, मोठी अपडेट Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसची खास योजना, महिना ₹10,250 मिळतील Credit Card Limit | क्रेडिट कार्ड वापरताना करू नका या 5 चुका, अचानक क्रेडिट कार्ड लिमिट कमी होईल
x

Rattan Power Share Price | 15 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, संधी सोडू नका, मालामाल करणार हा शेअर

Rattan Power Share Price

Rattan Power Share Price | रतन इंडिया पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 14.52 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत.

या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने नुकताच आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. आज शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी रतन इंडिया पॉवर स्टॉक 4.86 टक्के वाढीसह 15.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मार्च 2024 ला संपलेल्या तिमाहीत रतन इंडिया पॉवर कंपनीने 10665.75 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला 483.19 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. मार्च 2024 तिमाहीत कंपनीने 995.73 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तर मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 988.64 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये रतन इंडिया पॉवर कंपनीने 8896.75 कोटी रुपये एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षात या कंपनीला 1,869.85 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.

2023-24 या आर्थिक वर्षात रतन इंडिया पॉवर कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून 3,704.78 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. जे मागील वर्षी 3,559.36 कोटी रुपये होते. IIFL सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, रतन इंडिया पॉवर स्टॉक 18 रुपयेपर्यंत जाऊ शकतो.

रतन इंडिया पॉवर कंपनीचे 44.06 टक्के भाग भांडवल प्रवर्तकांनी धारण केले आहेत. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 55.94 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. प्रवर्तकांमध्ये RatanIndia Enterprises Limited कंपनीने रतन इंडिया पॉवर कंपनीचे 19.81 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर RR Imphaland Private Limited कंपनीने रतन इंडिया पॉवर कंपनीचे 24.25 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rattan Power Share Price NSE Live 24 May 2024.

हॅशटॅग्स

Rattan Power Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x