
RVNL Share Price | गुरुवार २१ नोव्हेंबरला स्टॉक मार्केटमध्ये जोरदार घसरण पाहायला मिळाली होती. स्टॉक मार्केटमध्ये सातत्याने (NSE: RVNL) घसरण सुरु आहे. मात्र या घसरणीत अनेक चांगले शेअर्स खरेदी करण्याची संधी गुंतवणूकदारांना मिळाली आहे. आरव्हीएनएल शेअर सुद्धा त्यापैकी एक आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
शेअर उच्चांकी पातळीवरून 30 टक्क्यांनी अधिक घसरला
रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअरमध्ये दोन महिन्यांनंतर पुन्हा तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवार 21 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.58 टक्के घसरून 421 रुपयांवर पोहोचला होता. आरव्हीएनएल शेअर ५२ आठवड्यांच्या ६४७ रुपयांच्या उच्चांकी पातळीपेक्षा ३० टक्क्यांनी अधिक घसरला आहे. त्यानंतर मागील काही दिवसांपासून चांगल्या वॉल्यूमसह या शेअरमध्ये खरेदी होताना दिसत आहे.
शेअरबाबत तज्ज्ञांचे संकेत
स्टॉक मार्केट तज्ज्ञांच्या मते, दीर्घ घसरणीनंतर आता आरव्हीएनएल शेअरमध्ये तेजी पाहायला मिळू शकते, असे संकेत दिसत आहेत. तथापि, तज्ञांचे मत आहे की उच्च पातळी गाठण्यासाठी आरव्हीएनएल शेअरला सतत रेझिस्टन्सच्या टप्प्यातून जावे लागेल.
कंपनीला मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाले
आरव्हीएनएल कंपनीला दक्षिण मध्य रेल्वेकडून नवीपेट स्थानक ते इंदलवाई स्थानक (३३.७० किमी) दरम्यान रुळाच्या दुहेरीकरणासाठी अभियांत्रिकी खरेदी बांधकाम (ईपीसी) कॉण्ट्रॅक्टसाठी वर्क ऑर्डर प्राप्त झाली आहे.
शेअरने 2031% परतावा दिला
मागील ६ महिन्यात रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअरने 23.19% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात शेअरने 152.25% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात शेअरने 1657.83% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना शेअरने 2031.65% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर शेअरने 131.32% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.