 
						IPO GMP | शुक्रवार २२ नोव्हेंबरला एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स लिमिटेड कंपनी आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स हा देखील मेनबोर्ड आयपीओ आहे. एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स कंपनी आयपीओचा आकार ६५०.४३ कोटी रुपये इतका आहे. एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स कंपनी आयपीओ २२ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. हा आयपीओ ग्रे-मार्केटमधून सकारात्मक संकेत देत आहे.
आयपीओ प्राइस बँड
एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स लिमिटेड कंपनीच्या आयपीओसाठी १४० ते १४८ रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. या आयपीओ’साठी गुंतवणूकदारांना किमान १४,९४८ रुपये गुंतवणूक करावी लागणार आहे. एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स लिमिटेड आयपीओ शेअर्सचे वाटप २७ नोव्हेंबरला करण्यात येणार आहे. तसेच एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स लिमिटेड कंपनी शेअर एनएसई आणि बीएसई’वर २९ नोव्हेंबरला सूचिबद्ध होणार आहे. कंपनीकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांना एका शेअरवर १३ रुपयांची सूट देण्यात येणार आहे. एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी १ लाख शेअर्स राखीव ठेवण्यात आले आहेत.
या आयपीओ मार्फत कंपनी ६५०.४३ कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करणार आहे. आयपीओच्या माध्यमातून एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स कंपनी ऑफर फॉल सेल अंतर्गत 3.87 कोटी नवीन शेअर्स आणि 53 लाख शेअर्स जारी करणार आहे. एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स कंपनीने अँकर गुंतवणूकदारांच्या माध्यमातून १९४.६९ कोटी रुपये उभे केले आहेत.
ग्रे मार्केट प्रीमियम
एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ आज ग्रे-मार्केटमध्ये ३८ रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहे. इन्व्हेस्टर्स गेनच्या रिपोर्टनुसार, एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स कंपनीसाठी हा सर्वाधिक जीएमपी ठरला आहे. मात्र गुरुवारच्या तुलनेत जीएमपीमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		