 
						Railway Ticket Booking | जगभरातील रेल्वे नेटवर्कपैकी भारत देश हा चौथ्या क्रमांकावर असणारा देश ठरला आहे. रेल्वे ही आपल्या सर्वसामान्यांसाठी आणि नोकर वर्गासाठी दररोजची लाईफलाईन आहे. दररोज करोडोंच्या संख्येने रेल्वे प्रवासी प्रवास करतात. लांबचा प्रवास करणाऱ्या व्यक्तींसाठी तर, ट्रेन ही घराप्रमाणेच असते. परंतु रेल्वेचे तिकीट बुक करताना आपल्याला तासंतास तिकीट काउंटरसमोर उभं राहावं लागतं. यामध्ये आपली एनर्जी आणि वेळ दोन्हीही वाया जातात.
सध्याच्या या डिजिटल युगात प्रत्येक गोष्ट डिजिटल पद्धतीने हाताळली जात आहे. मोठमोठ्या रांगा तसेच कार्यालयांमध्ये जाऊन होणारी कामं आता घरबसल्या मोबाईल ॲपद्वारे देखील केली जातात. अशातच तुम्हाला रेल्वेचे तिकीट बुक करायचं असेल तर तुम्ही ऑनलाइन पद्धतीने केव्हाही, कुठेही आणि कोणत्याही वेळी बुक करू शकता. तुम्हाला हव्या त्या ट्रेनची सीट कोणत्याही क्षणी बुक करता येणार आहे.
ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विविध ॲप उपलब्ध आहेत :
तसं पाहायला गेलं तर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विविध प्रकारचे ऑनलाइन टिकिट बुकिंग ॲप उपलब्ध आहेत. परंतु काही ॲप प्रायव्हेट कंपन्यांचे ॲप आहेत जे प्रवाशांकडून एक्स्ट्रा चार्जेस वसूलतात. ज्यामध्ये कन्व्हिनियस फी, पेमेंट गेटवे चार्ज आणि एजेंट सर्विस यांसारखे चार्जेस वसूलले जातात. या चार्जेसमुळे तुमचे तिकीट महागड्या स्वरूपाचे बनते. जे सर्व सामान्यांना परवडू शकत नाही.
सर्वात स्वस्त ट्रेन टिकिट इथे मिळेल :
तुम्हाला तिकीट काउंटरवरील तिकिटापेक्षा आणखीन स्वस्त दरात तिकीट खरेदी करायची असेल तर, सब्सिडरी कंपनी IRCTC च्या वेबसाईटवरून किंवा मोबाईल ॲपवरून तिकीट खरेदी करायचं आहे. आयआरसीटीसीच्या माध्यमातून तिकीट खरेदी केल्यामुळे तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे चार्जेस असारले जाणार नाहीत. त्याचबरोबर तुम्ही दिल्ली किंवा इतर लांबच्या प्रवासासाठी ऑनलाइन तिकीट बुक करून तब्बल 100 रुपयांपेक्षा जास्तीची बचत करू शकता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		