30 May 2023 12:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Symphony Share Price | कुलर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने 3,00,000 टक्के परतावा दिला, 1 लाखाच्या गुंतवणुकीचे झाले 30 कोटी, स्टॉक डिटेल्स Money Saving Tips | पैसे हाताशी थांबत नाहीत का? फॉलो करा या 8 टिप्स आणि आयुष्यातील आर्थिक बदल पहा शिंदे गट धोक्यात! आज निवडणूक झाल्यास शिंदे यांच्या शिवसेना गटाला केवळ 5.5% मते मिळतील, मनसे सर्वेतही शिक्कल नाही - सर्वेक्षण रिपोर्ट Adani Enterprises Share Price | 1 महिन्यात अदानी एंटरप्रायझेस शेअरने 32% परतावा दिला, अदानी स्टॉक तेजीत, ब्लॉकडीलची जादू काय आहे? Axita Cotton Share Price | सुवर्ण संधी! एक्झीटा कॉटन कंपनी 28 रुपयाचा शेअर 56 रुपयांना बायबॅक करणार, रेकॉर्ड डेटच्या आधी फायदा घ्या Bajaj Steel Industries Share Price | बजाज स्टील इंडस्ट्रीज शेअरने गुंतवणूकदारांना 1500 टक्के परतावा दिला, आता 60 टक्के लाभांश देणार Personal Loan | पर्सनल लोन घेताना या नकळत होणाऱ्या चुका टाळा, पर्सनल लोन घेताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे, जाणून घ्या
x

Investment Tips | नवशिक्यांसाठी महत्वाच्या गुंतवणूक टिप्स, या 5 चुका टाळा अन्यथा खिसा रिकामा होईल

Investment Tips

Investment Tips | गुंतवणुक करताना तुम्ही किती पैसे लावता याने काही फरक पडत नाही, मात्र तुम्ही किती कालावधीसाठी पैसे लावताय हे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही जितका जास्त काळ गुंतवणूक कराल तितका जास्त परतावा तुम्ही कमवू शकता. त्यामुळेच बचत आणि गुंतवणूक करण्याची सवय जेवढ्या लवकर लावाल तेवढे तुमच्या जास्त फायद्याचे आहे. तुम्ही कमाईला सुरूवात करताच पहिल्या पगार पासूनच गुंतवणूक सुरू केली पाहिजे. तुम्ही दर महिन्याला हजारो रुपये बचत केली पाहिजे हे जरुरी नाही. तुम्ही जे काही कमावता, त्यातील एक ठराविक भाग तुम्ही तुमच्या चांगल्या भविष्यासाठी बचत केला पाहिजे.

कर्जाच्या विळख्यापासून लांब रहा :
गुंतवणूक तज्ञ आणि वित्तीय सल्लागार म्हणतात की, तरुण नोकरीला लागल्यावर आपल्या लहान गरजा पूर्ण करण्यासाठी कर्जे घ्यायला सुरुवात करतात. योग्य आर्थिक नियोजन नसल्यामुळे लोक अनेकदा चुकीचे निर्णय घेतात आणि मग त्यांचे आयुष्य कर्जाच्या ओझ्याखाली दबले जाते. लोकांना या सर्व गोष्टींची माहिती येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. आज या लेखात आम्ही तुम्हाला 5 चुकांबद्दल माहिती देणार आहोत, जे तरुण आपल्या करिअरच्या सुरुवातीला करतात. तुम्ही या चुका टाळल्या पाहिजे अशी अपेक्षा

गुंतवणूक करण्यापूर्वी विमा खरेदी करा :
नोकरी लागताच तुमची कमाई सुरू झाली की, सर्वात आधी स्वतःसाठी आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करा. प्रथम स्वत:साठी आणि नंतर तुमच्या कुटुंबासाठी आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करा. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्याकडे विमा असणे खूप आवश्यक आहे.

नोकरीच्या लागताच गृहकर्ज घेणे टाळा :
नोकरी लागताच तुम्हाला कोणी भरगच्च पागर देणार नाही, सुरुवातीला पगार कमी असतो. अशा परिस्थितीत लोक चांगला पगार मिळवण्यासाठी शहर आणि नोकरी, कंपनी बदलत असतात. म्हणून नोकरी लागताच लगेच गृहकर्जाचे ओझे डोक्यावर घेऊ नका. सुरुवातील भाड्याच्या घरात राहिल्याने तुमच्यावर जास्त आर्थिक भार पडणार नाही. गरजेनुसार आणि सोयीनुसार तुम्ही घर, ठिकाण आणि शहर हवे तेव्हा बदलू शकता.

EMI वर लक्झरी वस्तू खरेदी करणे टाळा :
तरुण क्रेडिट कार्ड किंवा ईएमआयवर लक्झरी वस्तू सहज खरेदी करतात. ते शून्य व्याज आणि शून्य खर्चाच्या ईएमआय किंवा झटपट कर्जाच्या दुनियेत कर्जाचे बोझे विसरून जातात. या चुका टाळा. प्रथम बचत करा, नंतर गरज असेल तर महाग वस्तू खरेदी करा. EMI वर लक्झरी वस्तू खरेदी करणाऱ्याची सवय तुम्हाला भविष्यात त्रास देऊ शकते.

तुमच्या कमाईच्या 20 टक्के भाग बचत करा :
एक दीर्घकालीन आणि एक अल्पकालीन आर्थिक ध्येय निश्चित करा आणि ते साध्य करण्यासाठी गुंतवणूकीला सुरुवात करा. 50:30:20 चा फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवा. एकूण कमाईच्या किमान 20 टक्के बचत किंवा गुंतवणूक करा. कमाल रक्कम बचत करण्याचा प्रयत्न करा. अशा स्थितीत तुम्ही बचतीवर जास्त भर दिला पाहिजे.

चक्रवाढ व्याजाचे फायदे :
नोकरीला सुरुवात केल्यास शक्य तितक्या लवकर म्युचुअल फंडमध्ये SIP गुंतवणूक सुरू करा. एसआयपी गुंतवणुकीचा कालावधी जितका जास्त असेल तितका जास्त परतावा तुम्ही दीर्घकाळात कमवू शकता. एका उदाहरणाने समजून घेऊ. समजा तुमचे वय सध्या 20 वर्ष आहे. आणि तुम्ही दरमहा 3000 रुपये बचत करायला सुरुवात केली तर 30 वर्षांनंतर जेव्हा तुम्ही 50 वर्षांचे व्हाल तेव्हा तुमच्याकडे 1 कोटी 5 लाख रुपये एवढा मोठा फंड तयार झाला असेल. जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी 3000 रुपयांची म्युचुअल फंड एसआयपी गुंतवणूक केली तर वयाच्या 50 व्या वर्षी तुमच्याकडे 57 लाख रुपये जमा झाले असतील. फक्त 5 वर्षां आधी गुंतवणुकीला सुरुवात केल्यास तुम्हाला SIP वर दुप्पट पैसा मिळू शकतो. हीच आहे चक्रवाढ व्याजाची खरी शक्ती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Investment Tips for young people in the beginning of career to save huge huge amount and earn profit on 26 November 2022.

हॅशटॅग्स

#Investment Tips(142)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x