 
						Ashok Leyland Share Price | सोमवारी अशोक लेलँड लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला (NSE: ASHOKLEY) मिळाली होती. सोमवारी हा शेअर 4.84 टक्क्यांनी वाढला होता. सोमवार 25 नोव्हेंबर रोजी अशोक लेलँड शेअर 4.84 टक्के वाढून 234.80 रुपयांवर पोहोचला होता. अशोक लेलँड शेअर गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देऊ शकतो असे संकेत स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी दिले आहेत. (लेलँड लिमिटेड कंपनी अंश)
स्टॉक मार्केट तज्ज्ञ राजेश भोसले यांनी अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअर २२० रुपयांच्या वरच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. लेलँड लिमिटेड कंपनी शेअरसाठी २०८ रुपयांच्या पातळीवर स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. लेलँड लिमिटेड कंपनी शेअरसाठी २४० रुपये टार्गेट प्राईस देण्यात आली आहे.
स्टॉक मार्केट तज्ज्ञ राजेश भोसले यांनी म्हटले आहे की, ‘अशोक लेलँड लिमिटेड कंपनीचा शेअर त्याच्या दीर्घकालीन गतिमान सरासरीपासून वेग घेऊ लागला आहे आणि 20 दिवसांच्या एक्सपोनेन्शियल मूव्हिंग सरासरीच्या वर जाताना दिसत आहे. त्यामुळे शेअर शॉर्ट टर्ममध्ये तेजीत येऊ शकतो असे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत.
शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला
मागील १ महिन्यात अशोक लेलँड शेअरने 9.72%% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात अशोक लेलँड शेअरने 3.57% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात अशोक लेलँड शेअरने 31.21% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 196.65% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर अशोक लेलँड शेअरने 26.27% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		