4 December 2024 3:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: VEDL Investment Tips | असा वाढेल पैशाने पैसा, तुमच्याकडील पैसे पुन्हा होतील डबल; या पर्यायांमध्ये गुंतवणूक करा - Marathi News Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IPO GMP | स्वस्त IPO आला रे, ग्रे-मार्केट'मध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा मिळेल - GMP IPO 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगा'बाबत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, कर्मचारी आणि पेन्शनधारकांना धक्का Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SUZLON
x

IPO GMP | IPO शेअरचा ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, लिस्टिंगच्या दिवशी मल्टिबॅगर परतावा मिळण्याचे संकेत - Marathi News

Highlights:

  • ग्रे मार्केटमध्ये 74 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे
  • बजाज हाऊसिंग फायनान्स कंपनी बद्दल
  • कंपनीने 1,731 कोटी रुपये निव्वळ नफा
IPO GMP

IPO GMP | बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीचा IPO 2024 या वर्षातील सर्वाधिक चर्चित आयपीओ मनला जात आहे. 6560 कोटी रुपये मूल्य असलेल्या या IPO ला गुंतवणूकदारांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. या कंपनीचा IPO आतापर्यंत एकूण 67.41 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा 7.38 पट तर QIB चा कोटा 222.05 पट आणि NII चा कोटा 43.96 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. (बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कंपनी अंश)

ग्रे मार्केटमध्ये 74 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे
IPO मधून जमा होणारी रक्कम बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कंपनी आपल्या भविष्यातील व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि कर्ज परतफेड करण्यासाठी खर्च करणार आहे. बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 74 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीचे शेअर्स IPO इश्यू किमतीपेक्षा 105.7 टक्के प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. ज्या दिवशी हा IPO इश्यू उघडला त्या दिवशी या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 64 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

बजाज हाऊसिंग फायनान्स कंपनी बद्दल
सप्टेंबर 2015 पासून बजाज हाऊसिंग फायनान्स ही कंपनी नॅशनल हाऊसिंग बँकेत नोंदणीकृत नॉन डिपॉझिट गृहनिर्माण वित्त कंपनी म्हणून काम करत आहे. ही कंपनी मुख्यतः निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता खरेदी आणि नूतनीकरण संबंधित आर्थिक सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. या कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये गृहकर्ज, मालमत्तेवर कर्ज, भाडेतत्त्वावरील सवलत आणि विकासक वित्तपुरवठा या सेवा सामील आहेत.

कंपनीने 1,731 कोटी रुपये निव्वळ नफा
या कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 1,731 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. 2022-23 मधील 1,258 कोटीं रुपयेच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात 38 टक्के वाढ झाली आहे. बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीच्या IPO ची अंतिम तारीख 12 सप्टेंबर आहे. या कंपनीचे शेअर्स 16 सप्टेंबर रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केले जातील. तज्ञांच्या मते, बजाज हाऊसिंग फायनान्स कंपनीला जबरदस्त लिस्टिंग लाभ मिळण्याची शक्यता आहे.

Latest Marathi News | IPO GMP Bajaj Housing Finance Ltd 12 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

IPO GMP(144)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x