15 December 2024 1:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

Ration Stamp | रेशनकार्डला नव्या सदस्याचे नाव जोडण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया किचकट वाटते? जाणून घ्या पर्याय - Marathi News

Highlights:

  • रेशन कार्डमधील नाव जोडण्याची प्रक्रिया
  • ऑफलाइन पद्धतीने करा प्रक्रिया पूर्ण
  • जाणून घ्या ऑनलाईन पद्धत
Ration Stamp

Ration Stamp | रेशन कार्ड हे एक असं कागदपत्र आहे ज्याचा थेट संबंध कुटुंबाशी येतो. रेशन कार्डवर घरातील प्रत्येक सदस्याचे नाव असते. महत्त्वाच्या अनेक कामांसाठी रेशन कार्डचा अत्यंत फायदा होतो. रेशन कार्डमुळे तुम्हाला वेगवेगळे लाभ देखील होतात. आता रेशन कार्डमध्ये नवीन व्यक्तीचं नाव ऍड करायचं असेल किंवा नव्या सदस्याचं नाव रेशन कार्डला जोडून घ्यायचं असेल तर, नेमकं काय करावे लागेल?

रेशन कार्डमधील नाव जोडण्याची प्रक्रिया
आज आम्ही तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने रेशन कार्डमधील नाव जोडण्याची प्रक्रिया स्पष्टपणे सांगणार आहोत. त्याचबरोबर अनेकांना ऑनलाइन पद्धत किचकट वाटते त्यामुळे ऑफलाइन पद्धतीने प्रक्रिया कशी पूर्ण करायची पाहून घ्या.

ऑफलाइन पद्धतीने करा प्रक्रिया पूर्ण :
* ऑफलाइन पद्धतीने रेशन कार्डमध्ये नव्या सदस्याचं नाव जोडण्यासाठी तुम्हाला तुमची सर्व कागदपत्रे घेऊन जवळील अन्नपुरवठा केंद्रामध्ये जायचं आहे.
* तिकडे गेल्यावर नवीन सदस्य रेशन कार्डमध्ये जोडण्यासाठी जो फॉर्म भरावा लागतो तो फॉर्म भरून घ्या.
* तुम्हाला अर्ज करण्यासाठी थोडे पैसे मोजावे लागतील. संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर कागदपत्रांसह फॉर्म तेथील विभागामध्ये सबमिट करा.
* तुमचा फॉर्म सक्सेसफुल झाल्यानंतर अधिकारी तुम्हाला एक पावती देईल. ती पावती जपून ठेवा. कारण की, त्या पावतीमुळेच तुम्ही तुमचं ऑनलाईन राशन कार्ड माहिती चेक करू शकता.
* सर्व माहितीची व्यवस्थित पडताळणी करूनच अधिकाऱ्यांमार्फत दोन आठवड्यानंतर राशन कार्ड तुम्हाला घरपोच करतील.

जाणून घ्या ऑनलाईन पद्धत :
* सर्वप्रथम ऑनलाइन राज्याच्या अन्नपुरवठा अधिकृत वेबसाईटवर जा आणि लॉगिन आयडी बनवा.
* लॉगिन केल्यानंतर होम पेजवर नव्या सदस्याचे नाव जोडण्याकरिता पर्याय दिला गेला असेल. त्या पर्यायावर क्लिक करा आणि फॉर्म 8 डाऊनलोड करा.
* त्यानंतर नव्या सदस्याची संपूर्ण माहिती भरून फॉर्म, महत्त्वाचे डॉक्युमेंट्स सर्वकाही सॉफ्ट कॉपीसह अपलोड करा.
* ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर दिला जाईल. या डॉक्युमेंटमुळे तुम्ही तुमचा फॉर्म ट्रॅक करू शकता.
* त्यानंतर तुमचा संपूर्ण फॉर्म चेक करून तुम्ही व्यवस्थित माहिती भरली आहे की नाही या गोष्टीची पडताळणी करूनच तुमचा फॉर्म स्वीकारला जाईल.
* त्यानंतर पोस्टाद्वारे महिन्याभरातच तुमचं राशन कार्ड घरी येईल. दरम्यान राशन कार्डच्या कॉफीचा मेल तुमच्या मोबाईलवर सुद्धा येईल.

Latest Marathi News | Ration Stamp Process 12 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Ration Stamp(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x