23 September 2021 2:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

तुमचे पासवर्ड देखील असेच आहेत का? | मग सावधान | कधीही हॅक होईल - नक्की वाचा

Ten most used and common passwords

मुंबई, १९ जुलै | इंटरनेटवरील अनेक गोष्टींसाठी पासवर्डची सुविधा दिली जाते. सध्याच्या डिजिटल युगामध्ये पासवर्ड प्रत्येकाच्या आयुषाचा अविभाज्य भाग आहे. मोबाईल, इमेल असो वा सोशल मीडिया खातं असो पासवर्डमुळे यूझर्सची वैयक्तिक माहिती सुरक्षित राहते. त्यासाठी अनेक पोर्टल यूझर्सना अधिक सुरक्षित पासवर्ड ठेवण्याचं सुचवतात. पण अनेकजण लक्षात राहावं म्हणून सोपे पासवर्ड ठेवतात. संशोधनातून मागील 12 महिन्यात जगभरात सर्वाधिक वापरलेले 10 पासवर्ड समोर आले आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

विशेष म्हणजे या अडचणीवर मात करण्यासाठी अनेकजण विविध अकाऊंटसाठी एकच पासवर्ड ठेवतात. पासवर्ड लक्षात राहावा यासाठी युझर नकळत असे पासवर्ड निवडतात, जे हॅकर्स सहजरित्या क्रॅक करु शकतात. जगभरातील सर्वात कॉमन पासवर्ड ‘123456’ असून तो सहजरित्या हॅक केला जाऊ शकतो, असं समोर आलं आहे.

तज्ज्ञांच्या मते एकच पासवर्ड वारंवार वापरणेही धोकादायक आहे. डॉ. लैन लेवी यांच्यामते, एकच पासवर्ड विविध खात्याला आणि वारंवार वापरल्यास तो हॅक लवकर होऊ शकतो. पहिलं नाव, आवडीच्या खेळाडूचं नाव, जन्मतारीख यासारखे पासवर्ड ठेवू नका. हॅकर्स हे पासवर्ड कोणत्याही अडचणीशिवाय हॅक करु शकतात. काही युजर्स फुटबॉल टीम, बॅटमॅन आणि सुपरमॅन यांसारखे सुपरहीरो आणि पोकेमॉनसारखे कार्टून कॅरेक्टरही आपले पासवर्ड म्हणून ठेवतात.

12 महिन्यात सर्वाधिक वापरलेले पासवर्ड:
* 123456
* 123456789
* qwerty
* password
* 111111
* 12345678
* abc123
* 1234567
* password1
* 12345

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Ten most used and common passwords list hackers also keep eye change it news updates.

हॅशटॅग्स

#Technology(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x