25 April 2024 7:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

Success Mantra | सकारात्मक वृत्तीचा स्वीकार करा | अडचणीतून मार्ग निघतात

Tips, Positive attitude, success and happiness

मुंबई, ०१ मार्च: अत्यंत अडचणींचा, कठीण परिस्थितीचा सामना आयुष्यात प्रत्येकालाच करावा लागतो. यातून तरून पुढे जाण्यासाठी सर्वात महत्त्वाची कोणती गोष्ट असेल, तर ती म्हणजे सकारात्मक विचार करण्याची वृत्ती. तुम्ही किती सकारात्मकपणे परिस्थितीकडे बघता, यावर तुमचा जीवन दृष्टिकोन अवलंबून असतो. ज्या व्यक्ती आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे, वैयक्तिक आयुष्यात होणाऱ्या बदलांकडे सकारात्मकपणे बघतात. त्या नक्कीच यशस्वी होतात. आपल्या आयुष्यात जे काही घडेल, ते चांगलेच असेल, असा विचार करून पुढे जात राहणे माणसाला आनंदी तर ठेवतेच पण त्याची वाटचाल इतरांसाठीही प्रेरणादायक ठरते. (Tips for positive attitude leads to success and happiness)

अनेक लोक एकदा किंवा दोनदा अपयश आले की प्रयत्न करणेच सोडून देतात. अपयश आले म्हणजे आता पुढे काही करायलाच नको, असे आपल्या मनात निश्चित झालेले असते. पण अपयश हीच यशाची पहिली पायरी असते. अपयशाचा सामना करतच पुढे जाणारे एक दिवस यशस्वी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे अपयश आले म्हणून प्रयत्न करणे सोडायला नको. प्रयत्न सुरूच ठेवले पाहिजे, त्यातूनच यश मिळते. (Those who go ahead and face failure are known as successful one day)

त्यासाठी एकदा एका जैवशास्त्रज्ञाने एक प्रयोग केला. त्याने एका भल्या मोठ्या टँकमध्ये एक शार्क मासा आणि अन्य छोटे मासे सोडले. सुरुवातीला शार्क माशाने इतर लहान माशांना खाण्यास सुरुवात केली. काही दिवसांतच टँकमध्ये सोडण्यात येणारे सर्व छोटे मासे शार्कचा आहार बनले. मग त्या शास्त्रज्ञाने एक बदल केला. त्याने टँकच्या मध्यभागी काच लावून टँकचे दोन भाग केले. एका भागात शार्क मासा आणि दुसऱ्या भागात अन्य छोटे मासे. शार्कने काच लावल्यानंतरही छोट्या माशांना खाण्यासाठी त्या दिशेने जाण्यास सुरुवात केली. पण काचेमुळे तो पलीकडे जाऊच शकत नव्हता. तो काचेला धडकून परत यायचा. काही दिवसांनी शास्त्रज्ञाने टँकच्या मध्ये लावलेली काच काढून टाकली. पण शार्कने त्यानंतरही छोट्या माशांना खाण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. आपण आता छोट्या माशांना खाऊ शकणार नाही, हे त्याच्या लक्षात आले आणि मग त्याच टँकमध्ये छोटे मासे आणि शार्क मासा एकत्र राहू लागले. (The biologist performed an experiment, dropping a shark and other small fish into a large tank)

या गोष्टीतून हेच शिकायला मिळते की आपण प्रयत्न करणे सोडले नाही पाहिजे. अडचणी येतात पण त्यातूनही मार्ग निघू शकतो. त्यामुळे प्रयत्न करीत राहणे आवश्यक आहे.

 

News English Summary: Everyone has to face extreme difficulties, difficult situations in life. One of the most important things you can do to get through this is to think positively. Your outlook on life depends on how positively you view the situation. Individuals who look positively at the happenings around them, the changes that take place in their personal lives. They certainly succeed. Moving forward with the idea that whatever happens in your life will be good not only keeps you happy but also inspires others.

News English Title: Tips for positive attitude leads to success and happiness news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x