19 April 2024 8:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

दिवे लावण्यापेक्षा पंतप्रधानांनी आशेचा किरण दाखवायला हवा होता – राज ठाकरे

Covid 19, Corona Crisis, Raj Thackeray

मुंबई, ४ एप्रिल:  दिवे लावण्यापेक्षा पंतप्रधानांनी आशेचा किरण दाखवायला हवा होता, असं मत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. दिवे लावायला सांगण्याऐवजी त्यांनी लोकांना मार्गदर्शन केलं असतं, आपण देश म्हणून कुठे चाललो आहोत, याचा माहिती दिली असती तर बरं झालं असतं, असंही त्यांनी नमूद केलं. राज ठाकरे यांनी आज (शनिवार) राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी एकंदरीत परिस्थितीवर भाष्य केलं.

“मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे. यांच्यासाठी वेगळा विभाग उभा करावा आणि त्यांची वैद्यकीय उपाचर बंद करायला हवे. लोकांच्या अंगावर थुकतायत का, या लोकांना फोडून काढतानाचे व्हिडीओ व्हायरल हवेत. धर्म वैगेरे गोष्टी बोलायची ही वेळ नाही. पण मुसलमानांमधील काही अवलादी आहेत त्यांना आत्ताच ठेचलं पाहिजे. लॉकडाउन आत्ता आहे, नंतर आम्ही आहोतच,” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

करोनामुळे ओढवलेल्या संकटाच्या काळात पोलीस, नर्स आणि डॉक्टर जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करत आहेत. त्यांच्यावर हात उगारलाच कसा जाऊ शकतो?, असा सवाल करतानाच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या पोलीस आणि डॉक्टरांसह कोणत्याही कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना फोडून काढा, अशी संतप्त प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

देशातील निवणुकीच्या काळात कोणाला मतदान करायचं असं आवाहन करणारे मौलवी आहेत कुठे सध्या असा प्रश्न देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला. सध्याच्या वातावरणात विषय काय धर्माचा नाही असं सांगताना मरकझ जमातीच्या एकूण वागणुकीवर देखील संशय व्यक्त केला आहे.

तसेच आरोग्य खात्यावर कमीत कमी लक्ष दिलं गेल्यानं सध्या आणीबाणीची परिस्थिती उद्भवलीय. पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याच्या बाबतीत कठोर पावलं उचलावी लागतील अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली आहे असं देखील ते म्हणाले. आणीबाणीच्या परिस्थितीत काळा बाजार करणाऱ्यांना फोडून टाकलं पाहिजे. त्यांना अशा परिस्थितीत या गोष्टी सुचतात कशा? अत्यावश्यक सेवांची व्यवस्था सरकारनं योग्य पद्धतीनं केली पाहिजे. यांचा एक वेगळा विभाग करा. त्यांना फोडून काढतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले पाहिजेत तर लोकांना विश्वास वाटेल. पंतप्रधानांनी यावर बोलायला हवं होतं असं देखील ते म्हणाले.

 

News English Summary: MNS chief Raj Thackeray said that the Prime Minister should have shown a ray of hope rather than lighting the lamps. He said that instead of asking for lights, he would have guided the people, if they had informed us where we were going as a country, then it would have been better. Raj Thackeray today (Saturday) interacted with the people of the state. At that time, he spoke on the overall situation.

 

News English Title: Story MNS Chief Raj Thackeray speaks about Corona virus Covid 19 condition Maharashtra India social media News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x