26 January 2025 1:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Property Knowledge | 90% कुटुंबांना माहित नाही, लग्नानंतरही विवाहित मुलगी वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क मागू शकते, कायदा लक्षात ठेवा Income Tax Returns | नोकरदारांनो, टॅक्स वाचवण्यासाठी पती-पत्नी जॉईंट ITR भरू शकतात, जाणून घ्या त्याचे फायदे Govt Employees Pension | पेन्शन ₹9,000 वरून 25,740 रुपये होणार, तर बेसिक सॅलरी ₹18,000 वरून 51,480 रुपये होणार EPFO Passbook | पगारदारांनो आता नवे नियम, पैसे काढणे, अकाऊंट ट्रान्सफर, प्रोफाईल अपडेटचे नियम बदलले, जाणून घ्या नियम New Income Tax Regime | गुडन्यूज, 10 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, 25 टक्क्यांचा नवा टॅक्स स्लॅब जाहीर होण्याची शक्यता SBI Mutual Fund | एसबीआय फंडाच्या 3 जबरदस्त योजना, गुंतवणूकदारांना मिळतोय मोठा परतावा, पैशाने पैसा वाढवा
x

घरगुती गॅसच्या दरात अजून 25 रुपयाने वाढ | मोठ्या शहरांत अनुदान पूर्णपणे बंद

Oil companies, Gas cylinder rates

नवी दिल्ली, २६ फेब्रुवारी: सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी घरगुती गॅसच्या दरात पुन्हा सिलिंडरमागे २५ रुपये वाढ केली. यामुळे दिल्लीत १४.२ किलोच्या सिलिंडरचे दर ७६९ रुपयांवरून ७९४ रुपये झाले. वाढीव दर २५ फेब्रुवारीपासूनच लागू झाला आहे. ही वाढ उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींसह अनुदानित आणि विनाअनुदानित सिलिंडरवर लागू असेल.

फेब्रुवारी महिन्यातील ही तिसरी वाढ आहे. यापूर्वी ४ फेब्रुवारीला २५ रुपये आणि १५ फेब्रुवारीला ५० रुपये वाढवण्यात आले होते. यामुळे एका महिन्यातच सिलिंडर १०० रुपये महाग झाला आहे. डिसेंबरनंतर त्यात १५० रुपये वाढ झाली. तेल कंपन्यांचे म्हणणे आहे की, आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाढत्या दरात मागणीचा पुरवठा करण्यासाठी गॅस सिलिंडरचे दर वाढवण्यात आले होते.

मोठ्या शहरांत अनुदान पूर्णपणे बंद : तेल कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मेट्रो व मोठ्या शहरांत सिलिंडरवरील अनुदान बंद केले आहे. दिल्लीसारख्या शहरात सर्व ग्राहकांना पूर्ण किंमत द्यावी लागत आहे.

 

News English Summary: State-owned oil companies on Thursday hiked domestic gas prices by Rs 25 per cylinder. As a result, the price of a 14.2-kg cylinder in Delhi has gone up from Rs 769 to Rs 794. The hike has been in effect since February 25. This increase will be applicable to subsidised and non subsidised cylinders with the beneficiaries of Ujjwala scheme.

News English Title: Oil companies on Thursday hiked domestic gas prices by Rs 25 per cylinder news updates.

हॅशटॅग्स

#Gas cylinder(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x