4 February 2023 11:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Lotus Chocolate Company Share Price | मुकेश अंबानींच्या इंट्रीनंतर लय भाव खातोय शेअर, 1 महिन्यात 400% परतावा, स्टॉक डिटेल्स Titan Company Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपच्या या शेअरने झुनझुनवालांना प्रचंड पैसा दिला, आता नवी टार्गेट प्राईस पहा Mirae Asset Mutual Fund | मिरे अ‍ॅसेटने नवीन फ्लेक्सी कॅप फंड लाँच केला, दीर्घ मुदतीत मोठा परतावा, योजनेची डिटेल्स Home Buying Tips | घर खरेदी करणार असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा नुकसान अटळ, आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Oppo Reno 8T 5G | ओप्पो रेनो 8T 5G स्मार्टफोन भारतात लाँच, 108 MP कॅमेरा, किंमत आणि फीचर्स पहा Adani Total Gas Share Price | अदानी गॅसचा शेअर गॅसवर, 5 दिवसात 51% खाली कोसळला, कंपनीचा गॅस संपण्याच्या मार्गावर? Bajaj Finance Share Price | चमत्कारी शेअर! या स्टॉकने 1 लाख रुपयांवर तब्बल 12 कोटी रुपये परतावा दिला, आजही आहे फेव्हरेट
x

PPF Scheme | होय! सरकारी पीपीएफ गुंतवणूक सुद्धा करोडमध्ये परतावा देते, या टिप्स लक्षात ठेवा, मोठा परतावा मिळेल

PPF Scheme

PPF Scheme | तरुण वयात तुम्ही गुंतवणूक सुरू केली की, वृद्धापकाळात तुम्हाला आर्थिक गरजांची पूर्तता करण्याची चिंता होणार नाही. जर तुम्हाला वयाच्या 60 व्या वर्षी आनंदी आयुष्य जगायचे असेल तर, तर तुम्ही लवकरात लवकर गुंतवणुकीला सुरुवात केली पाहिजे. तुमच्या पहिल्या पगारापासूनच गुंतवणूकीला सुरुवात करा आणि चांगला फंड तयार करा. आजच्या काळात बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु सुरक्षित गुंतवणूकीची निवड करणे आणि त्यात नियमित गुंतवणूक करणे थोडे अवघड असू शकते. म्हणूनच बँकेत एफडी करण्याऐवजी तुम्ही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक केल्यास दीर्घकाळात चांगला परतावा कमवू शकता.

गुंतवणूकीवर मिळणारा परतावा :
पीपीएफ योजनेतील गुंतवणुकीवर मिळणारा व्याजदर भारत सरकारद्वारे ठरवला जातो. सध्या भारत सरकार आपल्या पीपीएफ योजनेत गुंतवणूक करणाऱ्या लोकांना 7.1 टक्के दराने व्याज परतावा देते. पीपीएफ स्कीममध्ये गुंतवणुक केल्यास एक विशेष फायदा मिळतो, तो म्हणजे तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याज पद्धतीने परतावा दिला जातो. पीपीएफ स्कीमच्या माध्यमातून तुम्ही 1 कोटी रुपयांपर्यंत परतावा कमवू शकता. जर तुम्ही वयाच्या 23 व्या वर्षापासून पीपीएफ योजनेत पैसे जमा करायला सुरुवात केली तर तुमच्या वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत तुमच्याकडे 1 कोटी रुपये निधी सहज तयार होऊ शकतो. 1 कोटी परतावा कमावण्यासाठी तुम्हाला किती गुंतवणूक करावी लागेल याचा एक हिशोब पाहू.

गुंतवणुकीवर मिळवा करोडो परतावा :
तुटपुंज्या पगारात आपले गरजा भागवणं कधी कधी अवघड जाते. म्हातारपणी जेव्हा तुमच्या कडे उत्पन्न नसेल तेव्हा गरजा भागवणे किती कठीण जाईल याची कल्पना करा. वृद्धावस्थेतील गरजांसाठी तुमच्याकडे एक चांगला फंड हवा. एक कोटी रुपयेचा फंड tayr करण्यासाठी तुम्हाला 37 वर्ष कालावधीसाठी दरमहा पीपीएफ खात्यात 5000 रुपये जमा करावे लागतील. आपल्या सर्वांना माहित आहे की PPF योजनेचा परिपक्वता कालावधी 15 वर्ष आहे. तुम्ही हा कालावधी 5-5 वर्षांच्या कालावधीसाठी आणखी वाढवू शकता. तुम्ही तुमच्या 23 वर्ष वयापासून आणि पुढे 37 वर्ष PPF मध्ये दरमहा 5000 रुपये गुंतवल्यास तुमच्याकडे करोडो रुपयेचा फंड तयार झाला असेल.

गुंतवणुकीवर असा मिळवा परतावा :
जर तुम्ही PPF खात्यात 23 व्या वर्षापासून दरमहा 5000 रुपये जमा करायला सुरुवात केली तर वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत तुमच्या गुंतवणुकीचा कालावधी 37 वर्ष असेल. या कालावधीत तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक 22,20,000 रुपये असेल. सध्याच्या 7.1 टक्के PPF व्याजा दरानुसार चक्रवाढ पद्धतीने गणना केली तर तुम्हाला व्याज परतावा म्हणून 83,27,232 रुपये मिळतील. मुद्दल आणि व्याज यांची बेरीज केली तर तुम्हाला 37 वर्षात 1,05,47,232 रुपये परतावा म्हणून मिळेल. अशा प्रकारे वयाच्या 60 व्या वर्षी तुमच्याकडे 1 कोटीचा फंड तयार झाला असेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| PPF Scheme for investment in young age to build huge fund in old age on 25 November 2022.

हॅशटॅग्स

#PPF Scheme(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x