15 December 2024 10:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर

Tata Communication Share Price

Tata Communication Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांच्या घसरणीसह 1740.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( टाटा कम्युनिकेशन्स कंपनी अंश )

या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2,085 रुपये होती. उच्चांक किमतीच्या तुलनेत शेअर सध्या 16 टक्के खाली आला आहे. आज मंगळवार दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी टाटा कम्युनिकेशन्स स्टॉक 1.27 टक्के वाढीसह 1,744.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक वाटत आहेत. तज्ञांच्या मते, आर्थिक वर्ष 2024-26 मध्ये कंपनीचा महसूल आणि EBITDA मध्ये अनुक्रमे 14 टक्के आणि 20 टक्के CAGR राहण्याचा अंदाज आहे.

तज्ञांच्या मते, 2024-26 याकाळात कंपनी 28,000 कोटी रुपये महसूल वाढीचे लक्ष्य साध्य करू शकते. कंपनीच्या निव्वळ कर्जात किंचित वाढ पाहायला मिळाली आहे. मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी टाटा कम्युनिकेशन्स स्टॉकवर 1,910 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.

नुकताच टाटा कम्युनिकेशन्स कंपनीने आपले मार्च 2024 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. मार्च तिमाहीत कंपनीचा नफा वर्ष-दर-वर्ष आधारावर 1.5 टक्क्यांच्या घसरणीसह 321.2 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी कंपनीचा नफा 326 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील आर्थिक वर्षात मार्च तिमाहीत कंपनीने 4,568.7 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तो आता 25 टक्क्यांनी वाढून 5,691.7 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

या कंपनीचा EBITDA वार्षिक आधारावर केवळ 2.1 टक्क्यांच्या वाढीसह 1,056.3 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. कंपनीचे प्रॉफिट मार्जिन मागील वर्षी 22.6 टक्के होते, जे आता 18.6 टक्क्यांवर आले आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने आर्थिक वर्ष 2023-24 च्या मार्च तिमाहीसाठी 16.70 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Communication Share Price NSE Live 23 April 2024.

हॅशटॅग्स

Tata Communication Share price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x