14 December 2024 10:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर
x

GST आणि तेल किंमतींविरोधात भारत बंद | 8 कोटी व्यापाऱ्यांचे समर्थन

Nationwide shutdown, e-way bills, Petrol diesel, GST

नवी दिल्ली, २६ फेब्रुवारी: ई-वे बिल, पेट्रोल-डिझेलचे वाढते दर आणि वस्तू व सेवा कर (GST) यावरुन आज अखिल भारतीय व्यापारी संघटनेने (कॅट) भारत बंदची हाक दिली आहे. रस्ते वाहतूक क्षेत्रातील सर्वोच्च संस्था ऑल इंडिया ट्रान्सपोर्टर वेलफेअर असोसिएशन (AITWA) आणि इतर संस्थांनीही या बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.

कॅटचे ​​सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले – शुक्रवारी देशभरातील 1,500 ठिकाणांवर निदर्शने केली जातील. सर्व बाजारपेठा बंद राहतील. 40 हजाराहून अधिक व्यावसायिक संघटनांशी संबंधित सुमारे 8 कोटी व्यापारी बंदला पाठिंबा देत आहेत.

GST दुरुस्तीमध्ये अधिकाऱ्यांना जास्त अधिकार, व्यापाऱ्यांसाठी संकट:
कॅटच्या मते, गेल्या वर्षी 22 डिसेंबर रोजी आणि त्यानंतर जीएसटी नियमांमध्ये अनेक बदल करण्यात आले होते. यात अधिकाऱ्यांना बरेच अधिकार देण्यात आले. आता कोणताही अधिकारी कोणत्याही कारणास्तव कोणत्याही व्यापाऱ्याचा जीएसटी नोंदणी क्रमांक निलंबित किंवा रद्द करू शकतो. बँक खाते आणि मालमत्ता जप्त करू शकतो. खास गोष्ट म्हणजे हे करण्यापूर्वी व्यावसायिकाला कोणतीही नोटीस दिली जाणार नाही. हे व्यावसायिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे.

 

News English Summary: The All India Chamber of Commerce and Industry (CAT) today called for a nationwide shutdown over e-way bills, rising petrol-diesel rates and Goods and Services Tax (GST). The All India Transporter Welfare Association (AITWA), the apex body in the road transport sector, and other organizations have also expressed support for the bandh.

News English Title: Nationwide shutdown over e way bills rising petrol diesel rates and GST news updates.

हॅशटॅग्स

#Bharat Bandh(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x