13 July 2020 7:21 AM
अँप डाउनलोड

जे.पी. नड्डा भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष

Bharatiya Janata Party, BJP President JP Nadda

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी जे. पी. नड्डा यांची वर्णी लागली आहे. पक्षाचे राष्ट्रीय निवडणूक अधिकारी राधामोहन सिंह यांनी जे. पी. नड्डा यांच्या नावाची घोषणा केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षासाठी आज दुपारी १२.३० पर्यंत अर्ज दाखल करण्याची वेळ होती. यावेळी जे. पी. नड्डा यांच्याशिवाय अन्य कोणत्याही नेत्याने अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे जे. पी. नड्डा यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अमित शाह यांचे उत्तराधिकारी म्हणून जे. पी. नड्डा यांच नाव आघाडीवर होतं. पक्षाने अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. तेव्हाच जे.पी. नड्डा यांची निवड करण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालं होतं.

राज्यसभेचे सदस्य असलेले जे. पी. नड्डा पक्षाच्या सर्वोच्च संसदीय बोर्डचे सचिवही आहेत. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांचा कार्यकाळ जानेवारी २०१९ मध्ये पूर्ण झाला. लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन अध्यक्षपदासाठीची निवडणूक टाळली गेली. केंद्रीय गृहमंत्री बनल्यामुळे जे. पी. नड्डा यांना जून महिन्यात कार्यकारी अध्यक्ष बनवले गेले. जे. पी. नड्डा मोदी सरकार-१ मध्ये आरोग्य मंत्री होते.

 

Web Title:  BJP Senior Leader JP Nadda elected unopposed national president of Bharatiya Janata Party.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Amit Shah(238)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x