26 July 2021 12:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

Health First | ताप कमी करण्यासाठी घरगुती उपाय | वाचा सविस्तर

Home remedies on fever

मुंबई, १५ जून | ताप येणे ही अत्यंत कॉमन समस्या आहे. वातावरणामध्ये फरक पडला अथवा थोडं काही इन्फेक्शन झालं तरीही ताप येतो. पण ताप आल्यावर लगेच घाबरून जायची गरज नाही. ताप आल्यावर आपण सर्वात पहिल्यांदा नक्कीच डॉक्टरकडे धावत जात नाही. तर सर्वात पहिल्यांदा आपण तापावर घरगुती उपाय करण्याकडे लक्ष देतो. ताप आल्यावर घरगुती उपाय काय करायचे हे साधारण घरामध्ये मोठ्या माणसांना माहीत असतं. पण काही वेळा आपल्याला नक्की काय घरगुती उपाय करायचे अथवा ताप येण्याची कारणे काय आहेत याची कल्पना नसते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

ताप आल्यानंतर साधारण आपण पॅरेसिटॅमोलच्या गोळ्या घेतो. सहाजिकच ताप कमी करण्यासाठी या गोळ्या परिणामकारक आहेत. मात्र काही नैसर्गिक उपायांनीदेखील तापावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं. ताप म्हणजे शरीरातील व्हायरल, बॅक्टेरियल इंफेक्शनला शरीरानेच केलेला प्रतिसाद असतो. औषधगोळ्यांचा परिणाम असतो तसाच त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम किंवा साईड इफेक्टसचा धोकाही असतो.

मग अशावेळी आपल्याला सल्ला द्यायलादेखील आजूबाजूला कोणी नसलं की आपोआप आपण गुगल सर्च करायला घेतो. पण व्हायरल ताप असेल तर आपल्याला घरगुती उपाय करून नक्कीच बरं वाटतं. तापामुळे अचानक आलेला थकवा जाण्यासाठीही हे उपाय उत्तम ठरतात. या लेखातून आपण ताप आल्यावर घरगुती उपाय काय काय करता येतील ते पाहूया. त्याआधी ताप येण्याची कारणे काय आहेत ते जाणून घेऊया.

ताप येण्याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे वातावरणातील बदल. प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या व्यक्तींना त्वरीत तापाची लक्षणे जाणवू लागतात. ज्या व्यक्तींची प्रतिकारकशक्ती कमी असते त्यांना तापाचा जास्त फटका बसतो. वातावरणामध्ये जरा जरी बदल झाला तरी अशा व्यक्तींना लगेच ताप येतो. सर्वात पहिले सर्दी आणि खोकला होतो आणि मग ताप येणे सुरू होतो. मात्र हा ताप काही काळापुरताच असतो. यावर घरगुती उपाय केल्यास हा ताप बरा होतो. यामध्ये डोके दुखणे, अंग दुखणे, घशाला त्रास होणे, थंडी वाजणे अशी लक्षणे दिसून येतात. पण हा ताप गंभीर नसला तरीही तुम्हाला योग्य वेळी यावर औषधोपचार करणेही गरजेचे आहे. जर छातीत जास्त दुखत असेल अथवा ताप उतरत नसेल तर मात्र तुम्ही वेळीच डॉक्टरांकडे जावे.

थंड पाण्याची पट्टी:
साहित्य:
* थंड पाणी
* स्वच्छ कॉटनचा कपडा

वापरण्याची पद्धत:
* थंड पाणी एका बाऊलमध्ये घ्यावे आणि असे दोन बाऊल आपल्याजवळ ठेवावे
* एका बाऊलमध्ये कॉटनचा कपडा भिजवून पाणी पिळून घ्यावे
* नंतर आपल्या कपाळावर त्याची पट्टी करून ठेवावी
* साधारण एक एक मिनिट्सने हीच प्रक्रिया करावी. काही वेळ असे करत राहिल्याने ताप उतरतो

तुळस:
साहित्य
* तुळशीची पाने
* सुंठ
* साखर
* पाणी

वापरण्याची पद्धत:
* गॅसवर पाणी उकळायला ठेवा. यामध्ये सुंठ, तुळशीची पाने आणि साखर मिक्स करा
* व्यवस्थित पाणी उकळायला लागले की बंद करा
* तयार झालेला काढा गाळून घ्या आणि ताप आलेल्या व्यक्तीला थंड करून प्यायला द्या

मध (Honey):
साहित्य

* मध
* पाणी
* पुदिना
* आले

वापरण्याची पद्धत:
* पाणी उकळत ठेवणे आणि त्यात पुदिन्याची आणि आल्याची पाने घालून उकळवणे
* पाणी उकळल्यानंतर ते गाळून घेणे आणि त्यात मध घालून मिक्स करणे
* हे पाणी थंड झाल्यावर पिणे. ताप त्वरीत उतरण्यास मदत मिळते

आले (Ginger):
साहित्य

* आल्याचे तुकडे अथवा आल्याची पावडर
* पाणी

वापरण्याची पद्धत:
* तुमच्याजवळ बाथटब असेल तर यामध्ये गरम पाणी घाला आणि त्यामध्ये आल्याची पावडर साधारण दोन ते तीन चमचे मिक्स करा
* या पाण्यात साधारण दहा मिनिट्स तसंच पडून राहा आणि आपलं शरीर याच पाण्याने स्वच्छ करा
* टॉवेलने पुसून गादीवर पुन्हा येऊन झोपा. यामुळे तुम्हाला गरम होईल. पण तरीही तुम्ही अंगावर चादर होऊन झोपा. जेणेकरून तुम्हाला घाम येईल आणि ताप पटकन उतरेल
* जर ही पद्धत नको असेल तर तुम्ही पाणी उकळवा त्यात आल्याचे तुकडे घालून पाणी उकळवा
* नंतर पाणी गाळून घ्या आणि त्यात मध मिक्स करून हा चहा प्या. यामुळेदेखील ताप उतरण्यास मदत मिळते

अॅपल साईड व्हिनेगर:
साहित्य
* थंड पाणी
* अॅपल साईड व्हिनेगर
* स्वच्छ कॉटनचा कपडा

वापरण्याची पद्धत:
* थंड पाणी एका बाऊलमध्ये घ्यावे आणि असे दोन बाऊल आपल्याजवळ ठेवावे. त्यामध्ये एक बूच अॅपल साईड व्हिनेगर मिक्स करा
* एका बाऊलमध्ये कॉटनचा कपडा भिजवून पाणी पिळून घ्यावे
* नंतर आपल्या कपाळावर त्याची पट्टी करून ठेवावी
* साधारण एक एक मिनिट्सने हीच प्रक्रिया करावी. काही वेळ असे करत राहिल्याने ताप उतरतो

लसूण:
साहित्य:
लसणीच्या पाकळ्या

वापरण्याची पद्धत:
* लसणीच्या पाकळ्यांची साले काढून टाकणे
* कच्ची लसूण तापामध्ये तोंडात घालून चघळणे

पुदीना:
साहित्य
*
पुदीना
* पाणी
* आले
* मेथी
* मध

वापरण्याची पद्धत:
* पाणी उकळवा आणि त्यात पुदिन्याची पाने, आल्याचे तुकडे, मेथी दाणे घाला
* हे पाणी उकळल्यावर गाळून घ्या
* त्यामध्ये मध मिक्स करून प्या

हळदीचे दूध:
साहित्य
* हळद पावडर
* दूध

वापरण्याची पद्धत:
* एक ग्लास दूध गरम करून घेणे
* त्यात एक चमचा हळद पावडर मिक्स करून गरम दूध पिणे

मुलेठी (Mulethi):

साहित्य:
* मुलेठी
* तुळस
* पाणी
* मध
* साखर

वापरण्याची पद्धत:
* पाणी उकळवायला ठेवणे आणि त्यामध्ये तुळस, मुलेठी, साखर घालून पाणी उकळवणे
* पाणी उकळल्यावर गाळून घेणे आणि त्यात मध मिक्स करणे
* हे पाणी दिवसातून दोन वेळा प्यायल्याने ताप कमी होतो

तापावर घरगुती उपचार:
ताप आल्यावर सर्वात महत्वाचे म्हणजे आराम करणे. यावेळी अजिबात घरातून बाहेर पडू नये. तुम्हाला कोणतेही इन्फेक्शन होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

* आल्याचा चहा प्या
* रोज मनुके खा
* धणेजिऱ्याचा काढा प्या
* तुळशीची पाने रोज खा
* गुळवेलीचा काढा यावर अत्यंत गुणकारी आहे
* अजिबात आंघोळ करू नका

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Home remedies for reducing fever health news updates.

हॅशटॅग्स

#Health(642)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x