18 November 2019 12:16 AM
अँप डाउनलोड

भाजपाची घोषणा, कर्नाटकात महिलांना मंगळसूत्र व स्मार्टफोन

बेंगळुरूः कर्नाटक विधानसभेच्या मतदानाला अवघे ७-८ दिवस शिल्लक राहिले असताना भाजपने त्यांच्या निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपकडून आश्वासनांची खैरात करण्यात आली असून महिला मतदारावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे चित्र आहे.

कर्नाटकातील गरीब महिलांना मोफत मंगळसूत्र आणि स्मार्टफोन देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच गरीब घरातील महिलांना २ लाखांपर्यंतचं कर्ज फक्त १ टक्का व्याजाने देणार असं अजून एक आश्वासन देण्यात आलं आहे.

२०१४ मध्ये आश्वासनांच्या खैराती वाटून भाजप सत्तेत आली होती. भाजपने जाहीरनामा बनविताना गरीब जनता, नारीशक्ती आणि बळीराजाकडे विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. तसेच कर्नाटकच्या दुष्काळग्रस्त भागांतील २० लाख शेतकऱ्यांना १० हजार रुपयांची मदत देण्याचंही आश्वासन देण्यात आलं आहे.

काय आश्वासनं देण्यात आली आहेत भाजपाच्या जाहीरनाम्यात:

१. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील सर्व महिलांना मोफत स्मार्टफोन
२. महिलांना २ लाखांपर्यंतचं कर्ज फक्त १ टक्का व्याजाने देणार
३. दुष्काळग्रस्त भागातील २० लाख शेतकऱ्यांना १० हजार रुपयांची मदत
४. शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दहा तास मोफत वीज
५. सिंचन योजनेसाठी दीड लाख कोटी रुपये
६. दारिद्र्य रेषेखालील महिलांना लग्नाच्या वेळी ३ ग्रॅमचं मंगळसूत्र मोफत
७. ३०० हून अधिक अन्नपूर्णा कँटीन
८. महिलांच्या उन्नतीसाठी १० हजार कोटींचा निधी
९. दारिद्र्य रेषेखालील महिला-मुलींना मोफत नॅपकीन
१०. महिलांना एक रुपयांत सॅनिटरी नॅपकीन
११. भूमिहीन शेतकऱ्यांसाठी २ लाख रुपयांची विमा योजना
१२. अनुसूचित जमातीच्या ४०० मुलांना शिक्षणासाठी परदेशी पाठवणार
१३. २४x७ भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइन
१४. शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दहा तास मोफत वीज
१५. महिलांच्या आणि मुलांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण राज्यांत सीसीटीव्ही कॅमेरे
१६. प्रत्येक तालुक्यात रनिंग ट्रॅक आणि स्वीमिंग पूल
१७. काँग्रेस सरकारविरोधात श्वेतपत्रिका

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1038)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या