देशात ५०६३ रुग्ण ठणठणीत बरे; पण कोरोनाग्रस्तांची संख्या २४,५०६ वर
नवी दिल्ली, २५ एप्रिल: देशात गेल्या २४ तासांत १ हजार ४२९ नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे तर ५७ जण मृत्युमुखी पडले आहेत. आरोग्य मंत्रालयानं शनिवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आता देशांत कोरोना विषाणू बाधितांचा आकडा हा २४ हजार ५०६ वर पोहोचला आहे. या आकडेवारीपैकी भारतात सध्या १८ हजार ६६८ रुग्ण हे कोरोनावर उपचार घेत आहेत तर ५ हजार ६३ लोक कोरोनाच्या संसर्गातून बरे झाले आहेत.
1429 new #COVID19 cases & 57 deaths reported in the last 24 hours as India’s total number of positive cases stands at 24,506 (including 5063 cured/discharged/migrated and 775 deaths) https://t.co/LpckKJ7nOb
— ANI (@ANI) April 25, 2020
दुसरीकडे, देशातील सर्वात जास्त करोना रुग्ण महाराष्ट्रात असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार आणि आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अद्यापही यश मिळालेलं नाही. राज्यात गेल्या गेल्या २४ तासात १८ मृत्यूंची नोंद झाली असून ३९४ नवे रुग्ण आढळले आहेत. यासोबत करोनाबाधित रुग्णांची संख्या ६८१७ झाली आहे. तर मृतांची संख्या ३०० च्या पुढे गेली असून ३०१ झाली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने काही अटींवर अत्यावश्यक व्यतिरिक्त सर्व दुकानांना उघडण्याची परवानगी दिली आहे. महिनाभराच्या लॉकडाऊननंतर नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या आदेशामध्ये शॉपिंग मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्सना परवानगी देण्यात आलेली नाही. निवासी कॉलनीच्या जवळील दुकाने आणि स्टँड अलोन दुकाने आजपासून उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी शहरी भागाला वगळण्यात आले आहे.
News English Summary: The number of corona cases in the country has been on the rise since March, with 775 people dying from the corona virus in the country so far, according to the health ministry. At the conference held on Friday, India’s recovery rate was 20.57 per cent, said Love Agarwal, Joint Secretary, Ministry of Health.
News English Title: Story India cases cross 24000 mark death toll touches 775 Covid 19 News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा