20 April 2024 5:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 21 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
x

Cell Phone Side Effects | अशाप्रकारे तुमचा मोबाईल तुमचं आरोग्य बिघडवतो | जाणून घ्या आणि सावध राहा

Side effect of cell phones

Cell Phone Side Effects | मोबाईल, स्मार्टफोन आता आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे, यात दुमतच नाही. एक बटण दाबताच आपण जगाच्या कान्याकोपऱ्यात असलेल्या व्यक्तीसोबत संपर्क साधू शकतो. इतकंच नाही तर इंटरनेटच्या माध्यमातून आपण जगाच्या पाठीवरील प्रत्येक गोष्टीची माहिती घेऊ शकतो. त्यामुळे स्मार्टफोन आपल्यासाठी किती गरजेचा आहे, हे लक्षात येतं. मात्र, मोबाईलमुळे आपलं आरोग्य देखील बिघडू शकतं, हे आपल्याला माहित आहे काय? मोबाईलचे देखील साईड इफेक्ट आहेत. फोनवर सतत स्क्रोल केल्यानं मान आणि डोळ्यांचे आजार उद्भवतात. चला तर मग जाणून घेऊ या मोबाईलमुळे नेमके काय आजार उद्भवतात.

मोबाईलमुळे डोळ्यांचे विकार वाढले:
डोळे हे आपल्या शरीरातील सर्वात नाजुक अवयव आहे. स्मार्टफोनचा अतिवापर केल्याच त्याची ब्लू स्क्रीन खराब होते. स्मार्टफोनची स्क्रीन फोटोरिसेप्टरला नुकसान पोहोचवू शकते. डोके दुखी, अंधूक दिसणे, डोळे कोरडे पडणे आदी व्याधी सुरु होतात. यासाठी तुमचा स्मार्टफोनच जबाबदार आहे. डोळ्यांना विश्रांती देणं गरजेचं आहे. 20 मीटर अंतरावर ठेवलेल्या वस्तूवर आपलं लक्ष केंद्रीत करावं. डोळ्यांची वारंवार तपासणी करावी.

कार्पल टनलची व्हाल शिकार:
1. तुम्ही दिवसातून 5-6 तास स्मार्टफोनचा वापर करत असाल तर कार्पल टनलची शिकार होण्याची शक्यता जास्त आहे. एका अभ्यासात असं दिसून आलं आहे की, किशोरावस्थेत मुलांमध्ये कार्पल टनलची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून आली आहे. हाता वेदना, डोकं सुन्न पडणं, तळ हाताला मुंग्या येणं आदी समस्य अलिकडच्या काळात वाढल्या आहेत. तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पाठ दुखीची देखील समस्या वाढल्या आहेत. स्मार्टफोनच्या अतिवापरातून या सर्व समस्या उद्भवत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

2. अनेक ऑनलाइन अभ्यासात असं स्पष्ट झालं आहे की, सेलफोन हा विविध प्रकारचे कीटक आणि विषाणूंचं घर आहे. सेलफोनच्या माध्यमातून विषाणू आपल्या त्वचेच्या संपर्कात येतात.

3. आपल्याला किमान 7-8 तासांची झोप गरजेची आहे. परंतु स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे बहुतांश नागरिकांना निद्रानाशची समस्या उद्भवली आहे.

4. सेलफोनच्या अतिवापरामुळे आपल्या मनावर अतिरिक्त तणाव वाढला आहे. मोबाईलचा अतिवापर आणि इंटरनेटवर तासंतास बसल्यानं आपल्या आरोग्याचं संतुलन बिघडलं आहे. त्यामुळे आपण स्वत: साठी काही नियम घालणं गरजेचं आहे. भोजन करताना स्मार्टफोन पाहू नये. सकाळी झोपेतून उठल्या उठल्या स्मार्टफोन पाहू नये.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Cell Phone Side Effects check details here 21 June 2022.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x