27 April 2024 6:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

पुण्यात चांगलं काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्या घरी राज ठाकरे स्वत: जेवायला जाणार | महिन्यातील ३ दिवस पुण्यात

Raj Thackeray

पुणे, १९ जुलै | पूढील वर्षी होणाऱ्या पुण्यातील महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे जोरदार तयारीला लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सलग ३ दिवसांसाठी पुणे दौऱ्यावर असून, शहरातील सर्व विभागांमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत, त्यांचे म्हणणे जाणून घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये कामाचा उत्साह वाढावा व पक्षाचे काम अधिक जोमाने व्हावे, यासाठी राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांसाठी एक त्यांना हवी हवी अशी संधी उपलब्ध करून दिली आहे.

प्रभाग अध्यक्ष ही नेमणूक रद्द करून, शाखा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची नेमणूक केली जाणार आहे. तसेच जो शाखा अध्यक्ष चांगल काम करेल, त्याच्या घरी आपण जेवण करण्यास जाणार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीवेळी मार्गदर्शन करताना सांगितले आहे.

जो शाखा अध्यक्ष चांगलं काम करेल, त्याच्या घरी आपण स्वत: जेवायला जाणार आहोत, असं राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितलं आहे. यामुळे मनसे शाखा अध्यक्षांमध्ये कमालीचा उत्साह निर्माण झाल्याचं दिसत आहे. याशिवाय, प्रत्येक महिन्याला तीन दिवस पुण्यात येऊन राज ठाकरे कामाचा आढावा देखील घेणार आहेत. ” अशी माहिती मनसेचे शहर अध्यक्ष व नगरसेवक वसंत मोरे यांनी दिली आहे.

दरम्यान शहरातील आठही मतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांशी राज संवाद उपक्रमा अंतर्गत संवाद साधला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आज (सोमवार) सेनापती बापट रोडवरील इंद्रप्रस्थ हॉल येथे झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Raj Thackeray will go for Lunch to the house of the branch president who will do a good job news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x