11 July 2020 12:38 PM
अँप डाउनलोड

आसाम, 'आयसिस'चे झेंडे लावणारे ६ भाजप कार्यकर्ते अटकेत - ए.एन.आय

आसाम : आयसिस या आतंकवादी संघटनेचे झेंडे झाडावर लावून ‘आयसिस’मध्ये शामिल होण्याचा आवाहन लिखित संदेशाद्वारे स्थानिक तरुणांना केल्याच्या संशयावरून ६ लोकांना आसाम मध्ये अटक झाली असून ते ६ जण भाजपचे स्थानिक कार्यकर्ते असल्याचे समोर आले आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

काही दिवसांपूर्वी आसाम मध्ये दोन ठिकाणी आयसिस या आतंकवादी संघटनेचे झेंडे झाडावर लटकवलेले आढळले होते. त्यावर आयसिस या आतंकवादी संघटनेमध्ये शामिल होण्याचं आवाहन देणारा मजकूर छापला होता. आसाम पोलिसांनी चौकशी अंती काही संशयितांना ताब्यात घेतलं होतं. ताब्यात घेण्यात आलेले सर्व आरोपी हे भाजपशी संबंधित असल्याचं समोर आलं आहे.

आसाम मधील स्थानिक मीडिया रिपोर्टर्सच्या माहिती प्रमाणे ७ मे रोजी पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे नलबाडी जिल्ह्यातील बेल्सोर भागातून भाजपच्या सदस्यांना ‘आयसिस’ या आतंकवादी संघटनेचे झेंडे लावण्याच्या संशयावरून अटक करण्यात आलं आहे. आयसिस मध्ये शामिल होण्याचे थेट आवाहन त्या झेंड्यावर करण्यात आल्याने आसाम पोलीस खडबडून जागी झाली आणि तपासाला वेग आला होता.

आसाम पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या संशयितांपैकी तपन बर्मन हा आधी काँग्रेसचा माजी आमदार होता. पण त्याने नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आणि सध्या स्थानिक भाजप जिल्हा कमिटी सदस्य आहे. पोलिसांनी ते झेंडे हटवले असून, त्यावर लिहिण्यात आलेले मेसेजेस हे अरबी भाषेत होते.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

BJP(416)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x