16 May 2024 12:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या 160 जागा कमकुवत तर जवळपास 30 टक्के विद्यमान खासदार पराभवाच्या छायेत

Upcoming Loksabha Election 2024

Upcoming Loksabha Election | आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्या मागील यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजप विद्यमान खासदारांना थेट तिकीट देण्यापूर्वी त्यांच्या लोकप्रियतेचा मतदारसंघनिहाय सर्व्हे घेतल्यानंतरच विचार करणार आहे असं वृत्त आहे. भाजप पक्ष नवीन आणि तरुण चेहऱ्यांनाही सोबत घेईल, पण वय किंवा कुटुंबातील सदस्यांना तिकीट न देण्याच्या कोणत्याही फॉर्म्युल्यावर फारसा भर देणार नाही. कुचकामी आणि कमकुवत खासदारांवरही पक्षाची नजर असून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात नेतृत्व त्यांच्याशी स्वतंत्रपणे संवाद साधणार आहे आणि त्यांना स्वतःहून बाजूला जाण्याच्या सूचना देण्यात येतील असं वृत्त आहे.

जवळपास ३० टक्के विद्यमान खासदारांची लोकप्रियता घसरली, मतदारांमध्ये रोष
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार नाहीत, तिथे पक्षाची रणनीती पूर्णपणे लोकसभा निवडणुकीनुसार सुरू आहे. पक्षाच्या खासदारांच्या लोकप्रियतेचेही मूल्यमापन केले जात आहे. भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षातील जवळपास ३० टक्के विद्यमान खासदारांची लोकप्रियता त्यांच्या मतदारसंघात घसरली असून, सर्वसामान्य जनतेसोबत भाजप पक्षाचे पदाधीकारी आणि कार्यकर्तेही त्यांच्या कामावर फारसे खूश नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे भाजपचे जवळपास ३० टक्के विद्यमान खासदार पराभवाच्या छायेत असल्याची माहिती भाजपाला अंतर्गत सर्व्हेतून प्राप्त झाली आहे. त्यामुळे आयत्यावेळी अनेकांचे पत्ते कट होणार याचे संकेत मिळाले आहेत.

जुन्या भाजप नेत्यांना बाजूला करून….
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी निवडणुकीत भाजप पक्ष संघटनेतील आणि जनतेतील खासदारांच्या लोकप्रियतेला मुख्य आधार बनवेल. त्यासाठी अनेक पातळ्यांवर सर्व्हे आणि संवादातून माहितीही गोळा केली जात आहे. वयाचे बंधन आणि कुटुंबातील सदस्यांना तिकीट देण्याबाबत लवचिक दृष्टिकोन ठेवला जाईल, असे संकेतही पक्षाने दिले आहेत. अशा परिस्थितीत विजयाची दाट शक्यता असलेल्या उमेदवारांना इतर घटकांपेक्षा प्राधान्य दिले जाणार आहे. मात्र, पक्ष घराणेशाहीला प्रोत्साहन देणार नाही. तसेच नव्या लोकांना अधिक संधी मिळणार आहे. तसेच निवडणूक येण्याची क्षमता असल्यास आयत्यावेळी जुन्या भाजप नेत्यांना बाजूला करून इतर पक्षातील नेत्यांना तिकीट देण्यात येईल अशी रणनीती आखली आहे.

कमकुवत जागा गमावलेल्या १६० हून अधिक जागांची तयारी
विशेष म्हणजे भाजपने आपल्या गमावलेल्या आणि काही कमकुवत जागा गमावलेल्या १६० हून अधिक जागांची तयारी खूप आधीच सुरू केली होती. त्यातही भाजपने आपली संघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे. मात्र, जवळपास एक तृतीयांश विद्यमान खासदारांचा अहवाल चांगला नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 37.36 टक्के मतांसह 303 जागा जिंकल्या होत्या. भाजपने २०१४ आणि २०१९ मध्ये सलग दोन निवडणुका जिंकल्यानंतर त्यांच्या जागाही वाढल्या आहेत. मात्र १० वर्षात महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांमुळे जनतेत प्रचंड राग असल्याने भाजप विरोधात प्रचंड मतदान होण्याची मोदी-शहांना प्रचंड भीती असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे धार्मिक आणि हिंदू-मुस्लिम मुद्द्यांवर भर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

News Title : Upcoming Loksabha Election 2024 check details on 18 June 2023.

हॅशटॅग्स

#Upcoming Loksabha Election 2024(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x