पंजाबमध्ये Jio मोबाईलच्या १३०० टॉवर्सचा वीजपुरवठा खंडित | शेतकरी आक्रमक
चंदीगड, २८ डिसेंबर: मोदी सरकारने ३ कृषी कायदे कॉर्पोरेट्ससाठी लागू केले आहेत. मोठमोठ्या उद्योगपतींचा फायदा करण्यासाठी सरकारने हा कायदा लागू केला आहे. परंतु, आता आम्ही Jio SIM पासून रिलायन्सच्या सर्व वस्तूंवर बहिष्कार टाकणार आहोत. उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या पेट्रोलपंपावरही बहिष्कार टाकू. त्यांच्या पेट्रोलपंपवरुन पेट्रोल घेणार नाही”, असा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी यापूर्वीच दिला दिला होता.
केवळ मोठमोठ्या कंपन्यांच्या फायद्यासाठी सरकार कृषी कायदे मागे घेण्यास तयार नाही. त्यामुळे आम्ही या कंपन्यांच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे”, असं आंदोलक शेतकऱ्यांनी सांगितलं होतं.
त्यानंतर रिलायन्स जिओ इंफोकॉमने एयरटेल आणि वोडाफोन-आयडियावर (VI) खोट्या बातम्या पसरवण्याचे आरोप केले होते. कंपनीने टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाकडे (TRAI) कडक कारवाईची मागणी केली होती. जिओचा असा आरोप होता की, एयरटेल आणि वोडाफोन-आयडियाने शेतकरी आंदोलनादरम्यान अनैतिकरित्या अशा अफवा पसरवल्या की, नव्या कृषी कायद्यामुळे जिओला फायदा होणार आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांचे समर्थन करणाऱ्या पंजाबमधील काही गटांनी राज्यातील रिलायन्स जिओच्या मोबाईल टॉवर्सवर हल्ला केला आहे. याचमुळे राज्यातील जीओच्या ग्राहकांना सेवा देण्यामध्ये अडचणी निर्माण होत असून अनेक ठिकाणी जिओच्या ग्राहकांना रेंज मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. फायनॅनशियल एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार आंदोलकाना समर्थ करणाऱ्या गटांनी पंजाबमधील जीओच्या एक हजार ३०० टॉवर्सचा वीजपुरवठा खंडित केला आहे. पंजाबमध्ये जिओचे नऊ हजार टॉवर्स आहेत.
News English Summary: Some groups in Punjab supporting farmers have attacked Reliance Jio’s mobile towers in the state. This is creating difficulties in serving the customers of Geo in the state and in many places there are complaints that the customers of Geo are not getting the range. According to the Financial Express, groups supporting the protesters have cut off power to 1,300 GEO towers in Punjab. Geo has nine thousand towers in Punjab.
News English Title: Protesting farmer groups cut power supply of 1300 Reliance Jio towers News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Smart Investment | स्मार्ट बचतीतून बनाल 1 कोटींचे मालक; गुंतवणुकीसाठी SIP चे माध्यम ठरेल फायद्याचे, असा वाढेल पैसा
- Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Metro Job | आता मेट्रोमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न होईल पूर्ण; अर्ज प्रक्रिया, पगार आणि पात्रता काय असेल जाणून घ्या