12 August 2020 9:22 PM
अँप डाउनलोड

गणवेश लिलावामुळे नौदल अधिकारी अक्षय-ट्विंकलवर संतापले

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार आणि त्याची पत्नी नौदल गणवेशाचा लिलाव करून ‘भारतीय नौदलाच्या भावनांशी खेळत’ असल्याचा आरोप करत कायदेशीर सूचना पाठवली आहे. अभिनेता अक्षय कुमारने ‘रूस्तम’ चित्रपटातील भारतीय नौदल अधिकाऱ्याचा गणवेश लिलावात ठेऊन जाहीरपणे विकल्यामुळे ११ लष्कर अधिकारी आणि इतर ८ अधिकाऱ्यांनी बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारला ही सूचना पाठवली.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

तसेच एका लष्करी अधिकाऱ्याने नौदलाचा स्वाभिमान असणाऱ्या वर्दीचा लिलाव न करण्याची विनंती अक्षय कुमारची पत्नी ट्विंकलला केली होती. परंतु तसे न केल्यास दोघांना थेट न्यायालयात खेचण्याचा इशारा या अधिकाऱ्याने अक्षय कुमार आणि ट्वीनकल खन्नाला दिला आहे. अक्षय कुमारला सूचना पाठविणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये एका नौदल अधिकाऱ्याच्या पत्नीचा आणि ७ निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

अभिनेता अक्षय कुमारने ‘रूस्तम’ चित्रपटातील भारतीय नौदल अधिकाऱ्याची भूमिका केली होती. परंतु त्यात तो गुन्हेगार दाखवला असल्याने हा नौदल गणवेशचा हा अवमान आहे आणि त्या भारतीय नौदलाच्या वर्दीवर वापरण्यात आलेले बॅजेस हे सुद्धा खरे असल्याने याचा गैरवापर होऊ शकतो. तसेच अशा जाहीर पब्लिक लिलावामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचण्याची शक्यता आहे असं या सूचनेत नौदलाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

भविष्यातील खबरदारी म्हणून या सूचनेची प्रत संरक्षण मंत्रालय आणि जिथे लिलाव झाला- सॉल्ट स्काऊट त्या कार्यालयात पाठविण्यातल आली आहे. त्याद्वारे भविष्यात भारतीय चित्रपटांमध्ये लष्कराचे गणवेश वापरणे आणि त्यानंतर ते परस्पर जाहीर लिलावात विकणे अशा घटनांवर सरकारने त्वरित कारवाई व्हावी असं म्हटलं आहे. हे लिलाव म्हणजे लष्करासाठी अत्यंत अपमानकारक आहेत, त्यामुळे सिनेमातील अभिनेत्यांना असे करण्यापासून रोखण्यासाठी लगाम घालणे गरजेचे आहे असं म्हटलं आहे.

अक्षय कुमारने नौदलाच्या वर्दीचा लिलाव करून लष्कराप्रती अनादर दाखवला असून त्याने लष्करातील अधिकाऱ्यांच्या, विधवा पत्नींच्या आणि निवृत्त अधिकाऱ्यांच्या भावना या लिलावमुळे दुखावल्या गेल्या आहेत अशी भावना व्यक्त केली आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Akshay Kumar(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x