14 November 2019 12:05 AM
अँप डाउनलोड

हिंदूचा अर्थच न कळल्याने, मी मंदिरात जाताच भाजपला त्रास होतो

बंगळुरू : मी मठांमध्ये व मंदिरांमध्ये गेलो की भाजप माझ्यावर टीका करते. परंतु वस्तुस्तिथी ही आहे की, भाजपला ‘हिंदू’ या शब्दाचा अर्थच कळत नाही. त्यामुळेच त्यांना माझ्या मंदिरात जाण्याला नेहमीच आक्षेप असतो असा घणाघात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपच्या हिंदुत्वाच्या राजकारणाचा समाचार घेताना केला.

हवाई दलाशी संबंधित राफेलची डील खूप चांगली आहे हे आम्हाला सुद्धा ठाऊक आहे. परंतु राफेलची डील केवळ मोदींच्या जवळच्या मित्रांसाठीच चांगली असल्याची टिपणी सुद्धा त्यांनी भाजपवर टीका करताना जोडली. नरेंद्र मोदी कोणत्याही ठोस विषयाशिवाय चीनच्या दौऱ्यावर गेले होते. परंतु चीनमध्ये गेल्यावर त्यांनी डोकलामबाबत एक चकार शब्द सुद्धा काढला नाही असं राहुल गांधी म्हणाले.

कर्नाटकातील निवडणूक प्रचाराच्या काळात भाजपनं शिष्टाचार पाळला नाही. त्यांनी केवळ आमच्यावर खालच्या पातळीवर जाऊन व्यक्तिगत टीका करण्यावर अधिक भर दिला. काँग्रेस मात्र मुद्द्यांवर निवडणूक लढत होतो असं राहुल यांनी सांगितलं. काँग्रेसने सामान्य जनतेत मिसळून त्यांचे विषय समजून घेतले आणि जाहीरनामा तयार केला. परंतु भाजच्या २-४ नेत्यांनी केवळ अर्ध्या तासांत जाहीरनामा तयार केला कारण तो त्यांनी काँग्रेसचा जाहीरनामा चोराला असा आरोप राहुल गांधी यांनी बंगळुरू येथे पत्रकार परिषद घेऊन केला.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1036)#Rahul Gandhi(123)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या