28 March 2023 2:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Khadim India Share Price | या कंपनी व्यवस्थापनतील फेरबदलांमुळे हा शेअर फोकसमध्ये आला, गुंतवणूक करावी का? Stocks To Buy | स्वस्त शेअर आश्चर्यकारक परतावा, किंमत 100 रुपयांपेक्षा ही कमी, अल्पावधीत मिळणार 60 टक्के परतावा, लिस्ट सेव्ह करा SIP Calculator | 1000 रुपयांच्या एसआयपीने 50 लाख मिळतील, एसआयपी कॅल्क्युलेटरने समजून घ्या फायदा New Tax Calculator | पगार वार्षिक 10 लाख रुपये, नवीन विरुद्ध जुनी टॅक्स व्यवस्था, किती टॅक्स भरावा लागेल पाहा PPF Calculator | जर PPF मध्ये दरमहा 10,000 रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीला किती मोठी रक्कम मिळेल? गणना समजून घ्या ITR Filing 2023 | 1 एप्रिलपासून करदात्यांना ITR फाईल करता येणार, कोणते नवे फायदे मिळतील पहा SIP Calculator | स्वतःच 1 कोटींचं घर घ्यायचं असल्यास किती SIP करून शक्य होईल? फायद्याचं गणित समजून घ्या
x

राहुल गांधींनी मजुरांशी गप्पा मारून त्यांचा वेळ फुकट घालवला - निर्मला सीतारामन

Lockdown, Migrants, Rahul Gandhi, Nirmala Sitharaman

नवी दिल्ली, १७ मे: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मजुरांची भेट घेणे ही निव्वळ नाटकीपणा असल्याची टीका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. त्या रविवारी दिल्लीतील पत्रकारपरिषदेत बोलत होत्या. यावेळी निर्मला सीतारामन यांनी म्हटले की, राहुल गांधी यांनी मजुरांशी गप्पा मारून त्यांचा वेळ फुकट घालवला. उलट त्यांनी मजुरांच्या बॅगा उचलून काहीवेळ चालायला हवे होते, असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले.

‘सरकारकडून जारी करण्यात आलेलं आर्थिक पॅकेज एक नाटक असल्याचा आरोप काँग्रेसकडून होतोय. पण खरे ड्रामेबाज तेच आहेत. राहुल गांधी रस्त्यावर बसून त्यांच्याशी चर्चा करतात आणि त्यांचा वेळ उगाचच वाया घालवतात. यापेक्षा त्यांनी मजुरांच्या मुलांना आणि सामान घेऊन त्यांच्यासोबत चालून त्यांची मदत करायला हवी होती’ असं निर्मला सीतारमण यांनी म्हटलंय.

दरम्यान, पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेसचं नाव येताच निर्मला सीतारामन भडकल्या. मी सोनिया गांधी यांना हात जोडून विनंती करते की त्यांनी आपण स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावर जास्त जबाबदारीने बोललं आणि वागलं पाहिजे असं यावेळी निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.

निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की, “मला विरोधी पक्षांना आवाहन करायचं आहे की, स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावर आपण एकत्र काम केलं पाहिजे. आम्ही सर्व राज्यांसोबत या मुद्द्यावर चर्चा करत असून लक्ष ठेवून आहोत. सोनिया गांधी यांना हात जोडून मी विनंती करते की, आपण स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावर जबाबदारीने बोललं आणि वागलं पाहिजे”.

 

News English Summary: Union Finance Minister Nirmala Sitharaman said that Congress leader Rahul Gandhi’s visit to the workers was a mere drama. She was speaking at a press conference in Delhi on Sunday.

News English Title: Corona virus Lockdown Finance Minister Nirmala Sitharaman Request Congress Sonia Gandhi News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x