
NTPC Green Share Price | स्टॉक मार्केटमध्ये दाखल झालेल्या एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवार 03 डिसेंबर 2024 रोजी एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर 10 टक्के वाढून 142.12 रुपयांवर पोहोचला होता. (एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनी अंश)
आयपीओ किमतीपेक्षा शेअर्समध्ये 30 टक्क्यांहून अधिक वाढ
एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये गेल्या ४ ट्रेडिंग सेशनमध्ये मजबूत तेजी दिसून आली आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचं शेअर्स मंगळवारच्या जोरदार तेजीनंतर आयपीओ इश्यू प्राइसच्या तुलनेत ३१ टक्क्यांनी वाढला आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचे मार्केट कॅप 1,19,738 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
कंपनी आयपीओ 2.55 पट सब्सक्राइब झाला होता
एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचा आयपीओ जवळपास २.५५ पट सब्सक्राइब झाला होता. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या आयपीओ’मध्ये रिटेल गुंतवणूकदारांचा कोटा ३.५९ पट सब्सक्राइब झाला होता. तर एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी कर्मचाऱ्यांकडून ०.८३ पट सब्सक्राइब करण्यात आला होता.
पहिल्याच दिवशी 121 रुपयांच्या वर पोहोचला होता
एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी आयपीओ शेअरची प्राईस बँड १०८ रुपये होती. एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीचा शेअर एनएसई’वर १११.५० रुपयांवर सूचिबद्ध झाला होता आणि सूचिबद्ध होण्याच्या दिवशी तो १२१.६५ रुपयांवर पोहोचला होता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.