3 February 2023 3:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर जबरदस्त कोसळले, खरेदीपूर्वी तुमच्या शहरातील आजचे नवे दर पहा RACL Geartech Share Price | जबरदस्त शेअर! 1051 टक्के परतावा देणारा शेअर ऑल टाईम फेव्हरेट, कारण काय? ISMT Share Price | 2200% परतावा देणारा 63 रुपयाचा हा शेअर दिग्गज गुंतवणूकदार खरेदी करत आहेत, स्टॉक डिटेल्स Adani Groups Penny Stocks | अदानी बॉण्ड्सची जागतिक लायकी शून्य, अदानी ग्रुपचे शेअर्स पेनी स्टॉक होणार? नेमकं काय होणार? Govt Employees DA Salary Hike | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, पगार DA वाढीसह आकडेवारी आणि तारीख समोर Bombay Super Hybrid Seeds Share Price | शेती बियाणे कंपनीच्या शेअरने पैसाच झाड, 6 महिन्यात 1382% परतावा दिला, रोज पैशाचा पाऊस Rail Vikas Nigam Share Price | सरकारी कंपन्यांचे शेअर्स फॉर्मात येणार, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी खरेदीसाठी हे 3 शेअर्स सुचवले
x

Airox Technology IPO | आयरोक टेक्नोलॉजी कंपनीचा IPO लाँच होणार, गुंतवणुकीची मोठी संधी, कंपनीचा संपूर्ण तपशील जाणून घ्या

Airox Technology IPO

Airox Technologies IPO |भारतीय शेअर बाजारात तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीचा ओघ वाढत आहे. आता अशीच एक कंपनी आयरोक टेक्नोलॉजी ही ऑक्सिजन जनरेटर बनवणारी कंपनी शेअर बाजारात आपला IPO घेऊन येणार आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये ऑपरेशनल खाजगी हॉस्पिटल PSA मेडिकल ऑक्सिजन मार्केटचा 50-55 टक्के मार्केट आयरोक टेक्नोलॉजीने काबीज केला आहे.

Airox Technologies सविस्तर :
आयरोक टेक्नोलॉजी एक वैद्यकीय उपकरणे बनवणारी कंपनी असून कंपनी लवकरच आपला IPO शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी खुला करणार आहे. कंपनीने आपला IPO बाजारात आणण्यासाठी बाजार नियामक सेबीकडे कागदपत्रे सबमिट केले आहेत. ही कंपनी आपला IPO मार्केट मध्ये आणून 750 कोटी रुपये उभारेल. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस म्हणजेच DRHP नुसार, आयरोक टेक्नोलॉजी कंपनी IPO मध्ये कोणतेही नवीन शेअर्स जारी करणार नाही. याचा अर्थ हा IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेल/OFS वर आधारित असेल.

IPO तपशील :
आयरोक टेक्नोलॉजी कंपनी आपल्या IPO मधून OFS जारी करणार आहे. आणि OFS चा भाग म्हणून कंपनीचे प्रमोटर्स संजय भरतकुमार जैस्वाल आणि आशिमा संजय जयस्वाल हे आपले शेअर्स विकणार आहेत. या अंतर्गत संजय जयस्वाल आपल्या एकूण शेअर होल्डिंग मधून 525 कोटी रुपयांचे शेअर्स विकणार आहेत. आणि आशिमा जयस्वाल आपल्या शेअर होल्डिंग मधून 225 कोटी रुपयांचे इक्विटी शेअर्स विकुन शेअर बाजारातून पैसे उभारणार आहेत. JM Financial आणि ICICI Securities यांना IPO इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या IPO च्या माध्यमातून आयरोक टेक्नोलॉजी कंपनीने शेअर बाजारातून 750 कोटी रुपये उभारण्याचे लक्ष निर्धारित केले आहे.

कंपनीचा उद्योग सविस्तर :
आयरोक टेक्नोलॉजी ही कंपनी ऑक्सिजन जनरेटर बनवते. आर्थिक वर्ष 2022 पर्यंत ऑपरेशनल खाजगी हॉस्पिटल PSA मेडिकल ऑक्सिजन बाजाराचा सुमारे 50-55 टक्के मार्केट ह्या कंपनीने काबीज केला आहे. Airox कंपनी 872 स्थापित आणि कार्यरत PSA ऑक्सिजन जनरेटरसह भारतीय रुग्णालयांना ऑन-प्रिमाइसेस PSA/प्रेशर स्विंग ऍडॉर्प्शन ऑक्सिजन जनरेटर पुरवण्याचे काम करते. PSA ऑक्सिजन जनरेटर असे उपकरण आहे जे हवेतून नायट्रोजन वायू शोषून घेतात आणि त्यावर प्रक्रिया करून ऑक्सिजन वायू तयार करतात. इतर पारंपारिक वैद्यकीय ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या तंत्रज्ञान पद्धतींच्या तुलनेत हे उपकरण कमी खर्चात ऑक्सिजनची निर्मिती आणि स्थिर पुरवठा करते.

वैद्यकीय ऑक्सिजनची वाढती मागणी :
कंपनीने आपल्या वार्षिक अहवालात म्हंटले आहे की, वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी आर्थिक वर्ष 2020 ते आर्थिक वर्ष 2027 पर्यंत 7-8 टक्क्यांच्या चक्रवाढ वार्षिक वाढ दराने वाढण्याचा अंदाज आहे, ह्याचा अर्थ मेडिकल ऑक्सिजन ची मागणी भविष्यात जास्त वाढणार आहे. भारतातील 80 टक्क्यांहून अधिक रुग्णालयांना आणि मेडिकल केंद्रांना वैद्यकीय ऑक्सिजन सिलेंडरद्वारे पुरवला जातो. अहवालात नमूद केले आहे की आर्थिक वर्ष 2027 पर्यंत, वैद्यकीय ऑक्सिजनची निम्म्याहून अधिक मागणी PSA उपकरणद्वारे पूर्ण केली जाईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Airox Technology IPO will be launch soon check details on 1 October 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x