16 December 2024 1:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

RVNL Share Price | RVNL शेअर्समध्ये तुफान तेजी, आणखी एक कॉन्ट्रॅक्ट मिळाला, याआधी 1700% परतावा दिला

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह 231.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स जोरदार तेजीत वाढत आहेत.

सध्या आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होत आहे कारण, या कंपनीने मध्य प्रदेश राज्यातील वीज पारेषण प्रकल्पासाठी सर्वात कमी बोली लावून कॉन्ट्रॅक्ट जिंकला आहे. मध्यप्रदेश राज्यातील या प्रकल्पाचे एकूण मूल्य 251 कोटी रुपये आहे. आज बुधवार दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 4.36 टक्के वाढीसह 233.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आरव्हीएनएल कंपनीला मध्यप्रदेश विद्युत वितरण कंपनीकडून जो कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे, त्याची पूर्तता पुढील 24 महिन्यांत करायची आहे. आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स काही वर्षांपूर्वी 12 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 230 रुपये किमतीवर पोहचला आहे.

मागील 4 वर्षांपेक्षा कमी कालावधीत आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1700 टक्के परतावा कमावून दिला आहे. 27 मार्च 2020 रोजी आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 12.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 16 जानेवारी 2024 रोजी या सरकारी कंपनीचे शेअर्स 231.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील 3 वर्षात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 690 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 29 रुपये किमतीवरून वाढून 231.90 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील 11 महिन्यांत आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 300 टक्के वाढवले आहेत. 28 फेब्रुवारी 2023 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 57.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील 6 महिन्यांत आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सची किंमत 95 टक्के वाढली आहे. आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 56.15 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 17 January 2024.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(155)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x