19 May 2024 12:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

MSTC Share Price | मार्ग श्रीमंतीचा! मल्टिबॅगर MSTC शेअर देऊ शकतो 130 टक्के परतावा, वेळीच एंट्री घेणार?

MSTC Share Price

MSTC Share Price | एमएसटीसी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील एमएसटीसी स्टॉक 8 टक्के वाढीसह 926 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक आपल्या नवीन 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचला आहे. एमएसटीसी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 239.65 रुपये होती.

मागील वर्षी या कंपनीचे शेअर्स आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मात्र आता हा स्टॉक 282 टक्क्यांनी वाढून उच्चांक किमतीवर पोहचला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 6,343.74 कोटी रुपये आहे. आज बुधवार दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी एमएसटीसी कंपनीचे शेअर्स 5.44 टक्के वाढीसह 966.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअर बाजारातील अनेक तज्ञांच्या मते पुढील काळात एमएसटीसी कंपनीचे शेअर्स आणखी वाढू शकतात. तज्ञांच्या मते पुढील 2-3 वर्षांत एमएसटीसी कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना 70-130 टक्के अधिक परतावा कमावून देऊ शकतात. म्हणजेच हा स्टॉक पुढील काळात 1,726 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

एमएसटीसी कंपनीमध्ये भारत सरकारची मोठी गुंतवणुक लागलेली आहे. यासह एमएसटीसी कंपनीने आपल्या ऑनलाइन मार्केटप्लेसद्वारे केलेले व्यापार ग्रॉस मर्चेडाईज व्हॅल्यू मागील पाच वर्षात 33 टक्क्यांच्या सरासरी वाढीसह आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 3,01,500 कोटी रुपयेवर पोहोचली आहे.

मागील एका महिन्यात एमएसटीसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 73.67 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यांत एमएसटीसी कंपनीच्या शेअर्सची किंमत 130 टक्के वाढली आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 33 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 190 टक्के परतावा कमावून दिला आहे. गेल्या पाच वर्षांत एमएसटीसी कंपनीच्या शेअर्सची किंमत 673.94 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | MSTC Share Price NSE Live 17 January 2024.

हॅशटॅग्स

MSTC Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x