
SIP Mutual Fund | म्युच्युअल फंडात दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी लार्जकॅप इक्विटी योजना अत्यंत फायद्याच्या मानल्या जातात. कारण की आतापर्यंत लार्जकॅप इक्विटी फंडातून गुंतवणूकदारांना सर्वाधिक परतावा मिळाला आहे. त्यामधीलच एक फंड म्हणजे, ‘फ्रँकलिन इंडिया ब्ल्यूचीप फंड’. या फंडाने गुंतवणूकदारांना वार्षिक आधारावर 18.5% परतावा दिला आहे.
समजा एखाद्या व्यक्तीने 31 वर्षआधी या फंडमध्ये 10000 रुपयांची SIP गुंतवणूक केली असती तर, सध्याच्या घडीला हे पैसे 13.64 कोटी रुपये झाले असते. म्हणजेच केवळ 37.2 लाखांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला जास्तीत जास्त परतावा मिळतो.
ब्ल्यूचिप कंपन्यांमध्ये केली गुंतवणूक :
फ्रँकलिन इंडिया ब्ल्यूचिप इक्विटी फंडाने आतापर्यंत 97% टक्क्यांची गुंतवणूक केली आहे. आतापर्यंतची समान गुंतवणूक 2.95% टक्के होती. दरम्यान या फंडाने ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज यांसारख्या ब्लूचिप कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केलेली आहे.
मिळाला उत्तम परतावा :
या फंडाने वेगवेगळ्या काळामध्ये चांगला परतावा मिळवून दिला आहे. बरेच गुंतवणूकदार यास जुन्या लार्जकॅप फंडामध्ये गुंतवणूक करण्याची जोखीम पत्करतात. या फंडाने 10 वर्षांत 11.35%, 7 वर्षांत 12.45%, 5 वर्षांत 16.45%, 3 वर्षांत 13.7% तर, एका वर्षात 25.66% परतावा मिळवला आहे.
महत्त्वाचं :
काही विशेषतज्ञ सांगतात की, लार्जकॅप फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदाराने त्याच्या मागील वर्षाच्या परताव्यावर गुंतवणूक करण्याचा विचार करू नये. कारण की, मागील वर्षाची गुंतवणूक पाहून तुम्हाला पुढील वर्षात तितक्याच पटीने किंवा त्याहून जास्त रिटर्न मिळण्याची हमी नसते. परंतु दीर्घकालीन गुंतवणूक करून लखपती व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला मात्र नक्की घ्यावा लागेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.