9 May 2024 10:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर्स तेजीत येणार? तज्ञांनी जाहीर केली नवीन टेटार्गेट प्राईस, डिटेल्स जाणून घ्या

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा उद्योग समूहाचा भाग असेलल्या ‘टाटा स्टील’ कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची घसरण पाहायला मिळाली होती. आज मात्र शेअरमध्ये किंचित सुधारणा पाहायला मिळत आहे. सोमवार दिनांक 27 मार्च 2023 रोजी ‘टाटा स्टील’ कंपनीचे शेअर्स बीएसई निर्देशांकावर 0.83 टक्के वाढीसह 102.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. IIFL सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी पुढील आठवड्यासाठी ‘टाटा स्टील’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (Tata Steel Limited)

स्टॉकबाबत तज्ञांचे मत :
IIFL सिक्युरिटीज फर्मच्या तज्ज्ञांच्या मते ‘टाटा स्टील’ कंपनीचे शेअर्स सध्या सपोर्ट झोनच्या जवळ ट्रेड करत आहेत. पुढील काळात टाटा स्टील कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसून येईल असे तज्ञ म्हणतात. तज्ञांनी या स्टॉकसाठी 114 रुपये अल्प कालीन लक्ष किंमत जाहीर केली आहे. म्हणजेच पुढील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 114 रुपये किमतीवर जाऊ शकतात. तज्ञांनी टाटा स्टील स्टॉकवर 94 रुपये स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

कंपनीसाठी सकारात्मक बातमी :
‘टाटा स्टील’ कंपनीने आपल्या पूर्ण मालकीची उपकंपनी, ‘टाटा स्टील युटिलिटीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस’ चे 4,65,116 इक्विटी शेअर्स 10 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. या अधिग्रहणानंतर TSUIS मधील टाटा स्टील कंपनीच्या शेअरची संख्या आता 6,27,51,221 वरून वाढून 6,32,16,337 वर गेली आहे. TSUISL ही कंपनी मुख्यतः शहर व्यवस्थापन, वीज वितरण, रिअल इस्टेट, क्षेत्रात व्यवसाय करते. 2021 2022 या आर्थिक वर्षात कंपनीने 1,193 कोटी रुपयेची उलाढाल केली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Steel Share Price BSE 500470 NSE TATASTEEL on 27 March 2023.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x