
House Rent | बऱ्याच सर्वसामान्य व्यक्तींना भाड्याच्या घरामध्ये राहणे अडचणीचे वाटत आहे. कारण की, भाड्याचे वाढते प्रमाण त्याचबरोबर फ्लॅट आणि विक्री घराच्या किंमतीमधील वाढ पाहून कमी पगार असलेल्या व्यक्तीला त्याच्या बजेटनुसार गोष्टींचे नियोजन करण्यास अडथळा निर्माण होत आहे. विशेषतः दिल्ली त्याचबरोबर मुंबईसारख्या शहरी ठिकाणी घराच्या किंमती गगनाला भिडले आहेत.
कोणी शिक्षणासाठी तर कोणी घर चालवण्यासाठी कामानिमित्त या मोठ्या शहरांमध्ये स्थायिक होण्याचा विचार करतात परंतु त्यांच्या पगारातील एक मोठा भाग भाड्यासाठी बाजूला पडतो. प्रत्येक महिन्याला भाड्याची मोठी रक्कम जात राहिली तर घर खर्च सांभाळून बचतीसाठी अजिबात पैसा शिल्लक राहणार नाही. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही भाड्याचे पैसे वाचू शकता. कसं पाहून घ्या.
तुमच्या बजेटनुसार परवडणाऱ्या शहरांमध्ये घर घ्या :
मोक्याच्या ठिकाणावर असलेली घरे भाड्याने देऊ नका. तुम्ही मुंबईसारख्या शहरी ठिकाणी तुमच्या बजेटनुसार आणि तुम्हाला परवडणाऱ्या घराचा विचार करा. जिथे सोयी सुविधा देखील असतील आणि भाड्याच्या किंमती देखील तुम्हाला परवडणाऱ्या असतील. असं घर शोधा.
भर भाडे वाचवण्यासाठी रूम मेट शोधून काढा :
हजारोंच्या संख्येने शिक्षणासाठी तरुणवर्ग शहरांमध्ये कमी किंमतीच्या जागा भाड्याने राहण्यासाठी शोधत असतात. तुम्ही देखील अशा व्यक्तीचा शोध घ्यायला हवा. ज्याला कमी किंमतीत भाडं भरायचं असेल. त्यामुळे तुम्हाला रूम मेट शोधावा लागेल. तुम्ही रूम मेट शोधला तर, तुमच्या भाड्याचे पैसे अर्धे होतील आणि पूर्ण जाणाऱ्या पैशांपैकी अर्धा भाग तुम्हाला स्व खर्चासाठी किंवा बचतीसाठी बाजूला काढता येईल.
वाटाघाटी करा :
ब्रोकरबरोबर किंवा घर मालकाबरोबर भाड्याच्या बाबतीत वाटाघाटी करण्यास संकोच करू नका. तुम्ही ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की, घरमालक केवळ चांगला भाडेकरू शोधत असतो. जो वेळेवर त्यांचे पैसे देईल आणि घर देखील साफसूत्र स्वच्छ ठेवेल. अशा व्यक्तींना घर भाड्याने देणे घरमालकांना परवडते. त्यामुळे तुम्ही तुमची प्रोफाइल कशा पद्धतीने इम्प्रूव्ह होईल याकडे लक्ष द्या. तुमचा स्वभाव आणि एकंदरीत सगळ्याच गोष्टी घर मालकाला आवडल्या तर तो तुमच्या भाड्याची रक्कम कमी करू शकतो.
बीज आणि पाण्याची बचत करा :
भाड्याच्या घरात राहत असाल तर पाणी त्याचबरोबर विजेचा अत्यंत कमी वापर करा. तुम्ही केवळ गरजेवेळी उपकरणे चालू ठेवा. अन्यथा तिथे तुमचे वायफळ पैसे खर्च होऊ शकतात. बल्ब, कुलर, पंखे, एसी, टीव्ही यांसारखी इतर उपकरणे विनाकारण सुरू ठेवू नका.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.