3 May 2025 4:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | शुक्रवार 13 डिसेंबर 2024 रोजी व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आले आहेत. शुक्रवारी व्होडाफोन आयडिया शेअर जवळपास 3 टक्क्यांनी वधारला होता. मात्र व्होडाफोन आयडिया शेअरचा सध्याचा भाव त्याच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकी किंमतीपेक्षा खूपच कमी आहे. तर 22 नोव्हेंबर 2024 रोजी या शेअर 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 6.61 रुपये होता. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)

व्होडाफोन आयडिया शेअरमधील तेजीची कारणे

व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने आपली 4G आणि 5G नेटवर्क क्षमता आणि कव्हरेज वाढविण्यासाठी पुढील 3 वर्षांत 50,000 ते 55,000 कोटी रुपयांच्या मजबूत भांडवली खर्चाची योजना जाहीर केली आहे. त्यानंतर व्होडाफोन आयडिया शेअर्सची जोरदार खरेदी झाल्याचं पाहायला मिळालं.

व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीची विस्तार योजना

व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या सहामाहीत भांडवली खर्चावर 2,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च केल्याची माहिती दिली आहे. यामुळे व्होडाफोन आयडिया कंपनीची 4G डेटा क्षमता जवळपास 14 टक्क्यांनी वाढली आहे. या कालावधीत व्होडाफोन आयडिया कंपनीने २२ दशलक्ष नवे युजर्स जोडले आहेत. विशेष म्हणजे आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या सहामाहीत व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी नेटवर्क विस्तार आणि सेवा सुधारणांसाठी अंदाजे 8,000 कोटी रुपये खर्चून अधिक विस्तार करण्याची योजना आखत देखील आहे.

दरवाढीची चिन्हे

व्होडाफोन आयडिया कंपनीने आणखी दरवाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. भविष्यातील गुंतवणुकीला आधार मिळावा आणि वाजवी परतावा मिळावा यासाठी ही दरवाढ आवश्यक असल्याचे व्होडाफोन आयडिया कंपनीने म्हटले आहे. तत्पूर्वी म्हणजे जुलै 2024 मध्ये व्होडाफोन आयडिया कंपनीने टॅरिफमध्ये वाढ केली होती. तसेच नोव्हेंबर 2021 मध्ये सुद्धा कंपनीकडून दरवाढ करण्यात आली होती. तसेच जगातील इतर बाजारांच्या तुलनेत भारतातील दर कमी असल्याचे व्होडाफोन आयडिया कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे महागाई लक्षात घेता दरवाढ आवश्यक आहे असं स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे.

सप्टेंबर तिमाहीचे निकाल

दुसऱ्या तिमाहीत व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीचा तोटा ७,१७५.९ कोटी रुपयांवर आला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीला ८,७४६.६ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला होता. दुसऱ्या तिमाहीत व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीला सेवेतून मिळणारे उत्पन्न 1.8 टक्क्यांनी वाढून 10,918.1 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vodafone Idea Share Price Friday 13 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(155)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या