
Penny Stocks | गुरुवार 19 डिसेंबर 2024 रोजी बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 964.15 अंकांनी घसरून 79,218.05 वर पोहोचला होता. गुरुवारी दिवसभरात निर्देशांक 1,162.12 अंकांनी घसरून अखेर 79,020.08 अंकांवर बंद झाला होता. तसेच स्टॉक मार्केट एनएसई निफ्टी 247.15 अंकांनी घसरून 23,951.70 अंकांवर पोहोचला होता.
शंतनू श्योरी एक्वा लिमिटेड कंपनी शेअर
दरम्यान, शेअर बाजारातील एक पेनी शेअर फोकस मध्ये आला आहे. शंतनू श्योरी एक्वा लिमिटेड या कंपनीचा शेअर तुफान तेजीत आला होता. गुरुवार 19 डिसेंबर 2024 रोजी शंतनू श्योरी एक्वा लिमिटेड कंपनी शेअर 10.60 टक्के वाढून 1.67 रुपयांवर पोहोचला होता.
बुधवारी १.५१ रुपयांवर बंद झालेला शंतनू श्योरी एक्वा लिमिटेड कंपनी शेअर गुरुवारी १० टक्क्यांनी वाढून १.६७ रुपयांवर पोहोचला होता. शंतनू श्योरी एक्वा लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 2.26 रुपये होता. तर शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 1.34 रुपये होता.
शंतनू श्योरी एक्वा लिमिटेड कंपनी शेअरहोल्डिंग पॅटर्न
शंतनू श्योरी एक्वा लिमिटेड कंपनीमध्ये प्रवर्तकांचा हिस्सा ९.४३% आहे. तर, सार्वजनिक शेअरहोल्डर्सकडे 90.57% हिस्सा आहे. शंतनू श्योरी एक्वा लिमिटेड कंपनीच्या प्रवर्तकांमध्ये शंतनू श्योरी यांच्याकडे 32,31,300 शेअर्स म्हणजेच 9.26% हिस्सा आहे.
कंपनीबद्दल
शंतनू श्योरी एक्वा लिमिटेड कंपनीची स्थापना १८ जून १९९३ रोजी करण्यात आली होती. १९९४ मध्ये शंतनू श्योरी एक्वा कंपनी पब्लिक लिमिटेड झाली. २०१३ मध्ये शंतनू श्योरी एक्वा कंपनीचे नाव बदलून ५२ वीक्स एंटरटेनमेंट लिमिटेड करण्यात आले. ही कंपनी चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातील तज्ज्ञ चालवतात.
कंपनीच्या वेबसाईटवरील उपलब्ध माहितीनुसार, या कंपनीचा पहिला चित्रपट “लव्ह यू सोनियो” होता, जो 26 जुलै 2013 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला होता. कंपनीचा पुढचा चित्रपट होता ‘किस किसको प्यार करू’, ज्यामध्ये कॉमेडीचा बादशहा कपिल शर्मा मुख्य भूमिकेत होता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.